शुक्रवार, २ सप्टेंबर २०२२.
भाद्रपद
शुक्ल षष्ठी, दक्षिणायन, वर्षा ऋतू, शुभकृतनाम संवत्सर.
राहुकाळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
आज चंद्र गुरूच्या ‘विशाखा’ नक्षत्रात आहे.
आज अनिष्ट दिवस, बलराम जयंती, कार्तिकेय दर्शन, घबाड दुपारी १.५२ पर्यंत आहे.
मेष:- आज अनुकूल दिवस नाही. अचानक एखादे संकट येऊ शकते. चुकीचे निर्णय होतील.
वृषभ:- घरात कलह होऊ शकतो. मतभेद संभवतात. शत्रूंना आज उत्तर देऊ नका. शांत रहा.
मिथुन:- समाधानकारक आर्थिक उलाढाल होईल. वाहन सुख लाभेल. मातेकडून लाभ होतील. उत्साह वाढेल.
कर्क:- प्रतिष्ठा पणाला लागेल. संतती कडे लक्ष द्यावे लागेल. धाडसी निर्णय नकोत.
सिंह:- वारसा हक्कांबाबत मतभेद होऊ शकतात. सट्टा बाजार टाळा. नुकसान होऊ शकते. दूरच्या प्रवासात त्रास संभवतो.
कन्या:- अकल्पित धनलाभ होऊ शकतो. व्यवसायात चांगले यश मिळेल. लेखकांना कीर्ती प्राप्त होईल.
तुळ:- जोडीदाराशी मतभेद संभवतात. प्रेमात अपयश येईल. गैरसमज होतील. संतती नाराज राहील.
वृश्चिक:- आरोग्य सांभाळा. व्यसने प्रलोभने टाळा. मित्रांकडून धोका संभवतो.
धनू:- घरात कुरबुरी होतील संयमाने परिस्थिती हाताळा. आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील.
मकर:- उत्तम दिवस आहे. अध्यात्मिक लाभ होतील. गुरू सन्निध लाभेल.
कुंभ:- कामाच्या ठिकाणी मन शांत ठेवावे लागेल. काही वादाचे प्रसंग येतील. विनाकारण त्रास होईल.
मीन:- सट्टा बाजारातून नुकसान संभवते. गुंतवणूक करताना योग्य सल्ला घ्या. विचारपूर्वक निर्णय घ्या. प्रवासात काळजी घ्या.
मंगेश पंचाक्षरी –