हॉटेल पेरूच्या बागेवर अंमली पदार्थ विरोधी विशेष पथकाची कारवाई

इंदिरानगर| वार्ताहर| स्मोकिंग झोन नसलेल्या परिसरात अवैधरित्या हुक्का साहित्य व अंमली पदार्थ बाळगल्या प्रकरणी इंदिरानगर भागातील पेरूची बाग येथे अंमली पदार्थ विरोधी विशेष पथकाने कारवाई केली. यात हुक्का पिण्याचा हुक्का पोट, हुक्का फ्लेवर व इतर साहित्य जप्त करण्यात आले.
पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या संकल्पनेतुन निर्माण करण्यात आलेल्या अंमली पदार्थ विरोधी विशेष पथकाला नाशिक शहर आयुक्तालय हददीत अवैध रित्या अंमली पदार्थ बाळगणारे व विक्री करणारे इसमांविरूध्द कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. पोलीस आयुक्तालय नाशिक शहर अंतर्गत असलेल्या उपनगर पोलीस ठाणे, हददीतील हॉटेल द पेरू फार्म इंदिरानगर येथे पथकातील अंमलदार यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली कि, आरोपी नितीन शांताराम आहिरे( वय २६ वर्षे धंदा- मॅनेजर, रा- पेरूचा बाग, इंदिरानगर नाशिक), शंकर राजाराम पांगरे ( वय ३० वर्षे धंदा- हॉटेल मालक, रा- टाइम ब्लॉसम अपा. चौथा मजला, पांगरे मळा, बडदेनगर, नाशिक) यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडुन हुक्का पिण्याचे हुक्का पॉट, हुक्का फ्लेवर, व इतर साहित्य असे एकुण १६,४०० रूपये किंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला . द पेरू फार्म हॉटेलमध्ये स्मोकींग झोन नसलेल्या ठिकाणी विनापरवाना बेकायदा हुक्का बार चालवुन, प्रतिबंधीत हुक्का ग्राहकांना सेवनासाठी जागा उपलब्ध करून देवुन हुक्याची साधने व प्रतिबंधीत तंबाखुजन्य पदार्थ पुरवली व हॉटेलमध्ये सात इसम हे प्रतिबंधीत तंबाखुजन्य पदार्थाचे सेवन करतांना मिळुन आले. त्यांच्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून उपनगर पोलीस ठाणे यांचेकडे वर्ग करण्यात आलेला आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) वसंत मोरे यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली सपोनि एच के नागरे, पोहवा भामरे, पोना डंबाळे, पोना कोल्हे, पोना भालेराव, पोना दिघे, पोअं नांद्रे, पोअं येवले, पोअ कुटे, पोअं बागडे, पोअं फुलपगारे, मपोअं भड, दरोडा व शस्त्र विरोधी पथकाचे सपोउनि गांगुर्डे पोहवा सूर्यवंशी, पोना सवळी, पोशि जोशी, मपोशि मल्लाह यांनी कामगिरी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *