स्वयंपाक करत असताना गॅस शेगडीवरील काच फुटली, गृहिणी बालंबाल बचावली
सिडको : विशेष प्रतिनिधी
चुंचाळे परिसरातील एक गृहिणी स्वयंपाक घरात स्वयंपाक करत असताना गॅस शेगडीवरील काच जोरात फुटल्याची धक्कादायक घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र गॅस शेगडीवरील काच फुटल्यामुळे मोठा हादरा झाला.
याबाबत अधिक माहिती अशी की चुंचाळे परिसरातील पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या सरोदे संकुलातील रुम नंबर येथे रहाणारे इक्बाल पिंजारी यांनी सन गेल्या दोन वर्षांपुर्वी कामटवाडे शिवारातील कोमल टॉवर येथे असलेल्या नाकोडा होम अप्लायन्स येथुन प्रेस्टीज कंपनीची ५ हजार १०० रुपये किंमतीची गॅस शेगडी विकत घेतली आहे इक्बाल पिंजारी यांची पत्नी आपल्या स्वयंपाकघरात जेवण बनवत असताना गॅस शेगडीवर असलेली काच अचानक फुटली यावेळी स्वयंपाक घरातील पोळीच्या पिठासह भाजी तसेच संपुर्ण घरात काचेचे तुकडे उडले होते . गॅस शेगडीवरील काच फुटल्याने मोठा आवाज झाला आणि त्या जागेवर धूरही पसरला. मात्र, यावेळी गृहिणीने चपळाई दाखवत स्वत:चा बचाव केला आणि किचनमधून सुरक्षितपणे बाहेर पडली.हा प्रकार पाहून परिसरातील नागरिकांनी तत्काळ मदतीचा हात पुढे केला. काही नागरिकांनी सुरक्षिततेसाठी गॅस लाइन बंद केली त्यामुळे मोठा अनर्थ टाळला आहे .
गॅस शेगडीवरील काच फुटण्याची ही घटना स्वयंपाकघरातील सुरक्षिततेची महत्त्वाची आठवण करून देते. गॅस शेगडीच्या सुरक्षिततेचे पालन करणे, काचेच्या भागांची नियमित तपासणी करणे, तसेच गॅस वापरण्याची काळजी घेतली पाहिजे, अशी सूचना तज्ञांनी दिली आहे.सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र यामुळे नागरिकांना गॅस वापराबाबत अधिक जागरूक होण्याची आवश्यकता आहे.
घिबली अॅपची कमाल मशालच्या जागी कमळ! मनमाड : आमिन शेख सध्याचा जमाना डिजिटलचा आहे. दररोज…
नियोजित वधुचे अफेअर उघड विवाहापूर्वीच आयकर अधिकारी असलेल्या वराने संपविले जीवन नाशिक : प्रतिनिधी नियोजित…
लासलगाव येथे पटेल सॉ मिलला आग श्री सिद्ध वीर हनुमान मित्र मंडळाच्या अग्निशमन टँकर मुळे…
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती अमाप उत्साहाने नाशिकरोड ः वार्ताहर…
शिधापत्रिकांची होणार तपासणी सिन्नर प्रतिनिधी तालुक्यात तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागामार्फत बोगस व अपात्र शिधापत्रिका शोध…
80 फेर्या सुरू; कमी दाबाच्या पाण्यामुळे नागरिक त्रस्त नाशिक : प्रतिनिधी वाढलेल्या तापमानाबरोबर शहरातील विविध…