नाशिक

लोणचे बनविण्यासाठी गृहिणींची लगीनघाई

संकरित वाणामुळे गावरान कैर्‍यांची वानवा, दर तेजीत

निफाड ः विशेष प्रतिनिधी
सर्वत्र खरीप पेरणीचे वेध लागले असून, वरुणराजाची हजेरी लागण्यापूर्वी लोणचे बनविण्यासाठी गृहिणींची लगीनघाई सुरू झाली आहे. पण दिवसेंदिवस गावरान आंब्यांची तोड होऊन संकरित वाणाच्या कलमीकरणाकडे सर्वांचाच ओढा वाढल्याने बाजारात गावरान कैर्‍यांची वानवा जाणवत आहे. आवक जेमतेम असल्याने त्याचे भाव दामदुप्पट झाल्याने लोणच्यासाठी लागणार्‍या गावरान कैर्‍या आंबट झाल्याचे चित्र निफाडसह सर्वत्र आठवडे बाजारात पाहावयास
मिळते.
ग्रामीण व शहरी भागात पावसाळा व हिवाळा ऋतूंत दररोजच्या भोजनासोबत आंब्याच्या लोणच्याचा वापर केला जातो. भोजनाचा स्वाद वाढविण्यासाठी विशेष लोणच्यावर भर दिला जातो. शेतावर जाणारे मजूर, कामगार, कष्टकरी भाकरी, ठेच्यासोबत लोणच्यास विशेष पसंती देतात. सध्या पेरणी कामास वेग येण्यापूर्वी सर्वत्र गृहिणी लोणचे बनविण्यासाठी घाई करताना दिसत आहेत. कैर्‍यांसोबतच लोणचे साठविण्यासाठी चिनीमातीच्या बरण्या खरेदी करत आहेत.
कैर्‍या खरेदीपासून तर लोणचे तयार होईपर्यंत यंदा मोठा खर्च येत असल्याने गृहिणींचा आर्थिक गणित कोलमडले आहे. लोणचे टाकण्यापूर्वी कैर्‍या फोडणे आवश्यक असल्याने पन्नास रुपये शेकडाप्रमाणे कैर्‍यांच्या फोडी करून घ्याव्या लागतात. त्यामुळे कैर्‍या फोडणार्‍यांना सुगीचे दिवस आले आहेत. लोणच्यासाठी मीठ, मोहरी, हळद, तेल, लसूण, मिरे, लवंग, तीळ आदी वस्तू लागत असल्याने त्यासाठी दुकानदारांकडे मागणी वाढली आहे.

यंदा बाजारात लोणचे घालण्यासाठी लागणार्‍या गावरान कैर्‍यांची आवक खूप कमी असल्याने भावात दुप्पट वाढ झाली आहे. त्यातच मसालेही महागले. कैर्‍या फोडून देणार्‍यांचेही दर वाढून लोणच्याची चव महागली. पण भोजनाचा स्वाद लोणच्याअभावी हरवल्यागत होतो. शेतावर जाताना भाकरीवर ठेचा अन् लोणचे असले, तर जेवण रुचकर होेते, हे नक्की.
ललिता बोरगुडे, नैताळे

Gavkari Admin

Recent Posts

ठाकरे गटाच्या या बड्या नेत्यावर नांदगाव पोलिसात गुन्हा दाखल

खासदार संजय राऊत यांच्यावर नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नांदगाव आमिन शेख शिवसेना उद्धव बाळासाहेब…

4 hours ago

मुलींचा सांभाळ करण्याचा कंटाळा आल्याने  आईने उचलले भयानक पाऊल

  मुलींचा सांभाळ करण्याचा कंटाळा आल्याने  आईने उचलले भयानक पाऊल शहापूर : साजिद शेख शहापूर…

9 hours ago

ट्रॅपची माहिती होती, तर सतर्क का केले नाही?

मंत्री गिरीश महाजन यांचा एकनाथ खडसे यांना सवाल नाशिक : प्रतिनिधी पुण्यात रेव्ह पार्टीवर पोलिसांनी…

9 hours ago

साप्ताहिक राशिभविष्य

दि. 27 जुलै ते 2 ऑगस्ट 2025 पुरुषोत्तम नाईक मेष : आप्तेष्टांच्या गाठीभेटी या सप्ताहात…

10 hours ago

महापालिका जिंकायचीय, वाद टाळून कामाला लागा

मंत्री गिरीश महाजन : सुनील बागूल, राजवाडे यांचा अखेर भाजपमध्ये प्रवेश नाशिक ः प्रतिनिधी भारतीय…

10 hours ago

कांदा उत्पादकांवर ओढावणार आर्थिक संकट?

दक्षिण भारत, मध्य प्रदेशातील कांद्याच्या आवकेने भाव गडगडण्याची शक्यता लासलगाव : समीर पठाण गेल्या काही…

10 hours ago