अग्निवीरांचे खडतर प्रशिक्षण सुरू
नाशिक :  प्रतिनिधी
नव्याने देशसेवेत दाखल झालेल्या अग्निवीरांना खडतर प्रशिक्षण आर्टिलरी सेंटरमध्ये सुरू झाले आहे.
पहिली तुकडी 18 ते 24 वयोगटातील  निवडलेली आहे. तरुण तडफदार अशा या प्रशिक्षणार्थ्यांना  आर्टिलरी सेंटरचे प्रशिक्षक खडतर प्रशिक्षण देत आहेत.
भल्या पहाटे या प्रशिक्षणार्थ्यांचा दिवस सुरू होतो आणि लष्कराच्या शिस्तीत सर्व  प्रशिक्षण देण्यात येत आहे.  देशातील विविध राज्यांच्या भागातून अग्निवीर म्हणून निवडले गेलेले हे प्रशिक्षणार्थी देशसेवेसाठी सज्ज होत आहेत. पहाटे पाचपासून सायंकाळी साडेपाचपर्यंत व्यायाम विविध प्रशिक्षणाद्वारे चार विभागात अग्निवीरांना ट्रेनिंग देण्यात येत
आहे.
भारतीय सैन्यामध्ये सेवा बजावता यावी यासाठी केंद्र सरकारने अग्निवीर भरती करण्यासाठी अग्निवीर योजना आणली आहे. या योजनेंतर्गत अग्निवीरांची भरती करण्यात आली आहे. पहिली तुकडी 2640 प्रशिक्षणार्थींची निवड होऊन त्यांचे ट्रेनिंग सुरू झाले आहे. या अग्निवीरांना  टेक्निकल असिस्टंट, रेडिओ ऑपरेटर, गणर,  ड्रायव्हर अशा चार विभागांत त्यांचा कल ओळखून तो तो विभाग दिला जात आहे. 31 आठवडे म्हणजेच सहा महिन्यांचे प्रशिक्षण नाशिक तोफखाना केंद्रातून प्रशिक्षण घेणार्‍या अग्निवीरांना भारतीय सैन्यात तोफा चालविणारा गण तांत्रिक सहाय्यक रेडिओ ऑपरेटर मोटर ड्रायव्हर या चार पदांवर सेवा बजवावी लागणार आहे. यासाठी मूलभूत शास्त्रशुद्ध सैनिकी प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षकांकडून देण्यात येत आहे. प्राथमिक सैनिकी शिक्षण दहा आठवड्यांचे तर 21 आठवड्यांचे ऍडव्हान्स सैनिकी प्रशिक्षण दिले जाणार आहे.
वीर प्रशिक्षणार्थी प्रतिक्रिया
देशाच्या विविध कानाकोपर्‍यांतून आलेल्या अग्निवीरांनी आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या.
आम्ही देशसेवेसाठी तत्पर असून, जोशमध्ये वाहून घेतले आहे. हे सहा महिन्यांचे ट्रेनिंग आम्हाला आयुष्यभर उपयोगी पडणार आहे. अग्निवीरांचे प्रशिक्षण काय असते? याचा आम्ही आता प्रत्यक्ष अनुभव घेत आहोत.
सर्व टर्म कंडिशन माहिती असून, केवळ 25 टक्केच अग्निवीरांना पुढे संधी मिळणार आहे, हेही माहीत असल्याने आमचं शंभर टक्के योगदान देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत.
राज्यात पाच ठिकाणी प्रशिक्षण
पुणे, नागपूर, नाशिक, नगर या ठिकाणी अग्निवीर प्रशिक्षणार्थींचे ट्रेनिंग सुरू झाले आहे. नगर येथे दोन सेंटरमध्ये ट्रेनिंग सुरू आहे. आर्टिलरी सेंटर रोडवरील अशोक चक्र प्रवेशद्वारात प्रवेश केल्यानंतर अग्नी रिसेप्शन सेंटर उभारण्यात आले आहे. येथे आल्यानंतर कागदपत्र पडताळणी, त्यानंतर प्रेरणादायी चित्रपट दाखविले जातात. त्यानंतर या प्रशिक्षणार्थींचे कागदपत्र पडताळणी केली जाते. तेथील अधिकार्‍याने सही केल्यानंतरच त्यांना ट्रेनिंगसाठी प्रवेश दिला जातो. त्यानंतर या प्रशिक्षणार्थींना 39 वस्तू दिल्या जातात. यात टोपीपासून बुटांपर्यंत बारीकसारीक रोज लागणार्‍या वेगवेगळ्या ट्रेनिंगसाठी वेगवेगळे ड्रेस, पाणी बॉटल, बेल्ट, बॅग, जॅकेट आदी  वस्तू दिल्या जातात. या प्रशिक्षणार्थींचे केस कापण्यापासून ते लष्करातील जीवनमान कसे असावे, याबद्दल खरंतर प्रशिक्षण दिले जाते. संध्याकाळच्या वेळी विविध क्रीडाप्रकार खेळले जातात. या प्रशिक्षणार्थींना नाश्त्यासह जेवणाची व्यवस्था, योग्य पोषण आहार दिला जात असून, इतर लष्करी प्रशिक्षणाप्रमाणेच यांनाही सर्व सुविधा दिल्या जात आहेत.
पहिल्या टप्प्यात 2640 मुलांची निवड
देशातील विविध राज्यांतील तरुणांनी अग्निवीर परीक्षेसाठी फॉर्म भरले होते. त्यांच्या निवडीनंतर या तरुणांचा तोफखान्याचे कमांडर ब्रिगेडियर ए राकेश यांच्या नेतृत्वाखाली अग्निवीरांसाठी अद्ययावत यंत्रणा उभारण्यात आली आहे. भारतीय सैन्यदलात चार वर्षांसाठी देशसेवा करण्याची संधी या योजनेतील युवकांना देण्यात आली आहे. सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीची संधी उपलब्ध करून देण्याचा उद्देश केंद्र शासनाने ठेवला आहे. संपूर्ण देशात 25000 तरुणांना अग्निवीरांची सैन्यात भरती करण्यात येत आहे. त्यात पहिल्या टप्प्यात 2640 मुलांची निवड झाली आहे. 2 जानेवारीपासून प्रशिक्षण सुरू झाले आहे.
आठ ऑगस्टपर्यंत हे प्रशिक्षण सुरू राहणार असल्याची माहिती आर्टिलरी सेंटरच्या अधिकार्‍यांनी दिली. तसेच दुसरी तुकडी मार्चमध्ये दाखल होणार आहे. त्यांचेही प्रशिक्षण येथेच होणार आहे.
Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

फरार भूषण लोंढेच्या मुसक्या आवळल्या

फरार भूषण लोंढेच्या मुसक्या आवळल्या त्याच्यासह सहकार्‍याला नेपाळ सीमेजवळून अटक सिडको : विशेष प्रतिनिधी सातपूर…

17 hours ago

थेटाळेजवळ वाहनाच्या धडकेने तरुणाचा मृत्यू

लासलगाव : वार्ताहर निफाड तालुक्यातील थेटाळे शिवारात मंगळवारी दुपारी 2.30 च्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत…

19 hours ago

वृक्षतोड साधूंसाठी की संधिसाधूंसाठी?

हवेची शुद्धता राखण्यासाठी 33 टक्के वृक्ष, झाडी आणि बगीचा असणे गरजेचे आहे, पण झाडांची संख्या…

21 hours ago

सिन्नर नगरपरिषदेसाठी सरासरी 67.65 टक्के मतदान

मतदान यंत्रात किरकोळ तांत्रिक बिघाड; धक्काबुक्की, शाब्दिक बाचाबाची आणि तणावाचे वातावरण सिन्नर : प्रतिनिधी सिन्नरला…

21 hours ago

नाशिक जिल्ह्याची ओळख आता ‘बिबट्यांची पंढरी’?

देवगाव, रुई, गोंदेगाव, मरळगोई परिसरात बिबट्यांचा वाढता वावर लासलगाव : वार्ताहर द्राक्ष उत्पादनामुळे जागतिक ओळख…

21 hours ago

रासायनिक खतांच्या दरात पुन्हा वाढ

शेतकरी मेटाकुटीस; गोणीमागे 200 ते 250 रुपये अधिक मोजावे लागणार लासलगाव : वार्ताहर गेल्या काही…

21 hours ago