महाराष्ट्र

एचपीटीतील लिट-फेस्टमध्ये इंग्लिश-फ्रेंच संस्कृतीचे दर्शन

एचपीटीतील लिट-फेस्टमध्ये इंग्लिश-फ्रेंच संस्कृतीचे दर्शन

नाशिक :- एचपीटी आर्ट्स अ‍ॅण्ड आरवायके सायन्स महाविद्यालयातील इंग्रजी विभागाच्या विद्यार्थ्यांनी लिट-फेस्ट (लिटरेचर फेस्टिव्हल-साहित्य उत्सव) च्या माध्यमातून इंग्लिश-फ्रेंच संस्कृतीचे दर्शन संगीत, गायन नृत्य आणि नाटकांच्या माध्यमातून घडविले. ‘गुरुदक्षिणा’तील पलाश हॉलमध्ये बुधवारी हा कार्यक्रम पार पडला.
इंग्रजी विभागाच्या वतीने सादर करण्यात आलेला हा दहावा लिटफेस्ट होता. यामध्ये हर्षवर्धन वैद्य आणि त्याच्या टीमने ‘मॅलेफिसियंट’ नाटकातील एक भाग सादर केला, तर भक्ती सोनवणे आणि तिच्या टीमने ‘इन द लाईफ ऑफ ऑथर’ या नाटकातील एक भाग सादर केला. जान्हवी आणि तिच्या टीमने समूह नृत्य (सालसा, बॉसरुम, हिप-हॉप) सादर केले. अनुश्री देशमुख हिच्या टीमने ‘लेट मी लव्ह यू’ हे समूहगीत सादर केले. श्रध्दा पगारे आणि अंजली सिंग यांनी टेल ऑफ ट्युन्स–अ डिझ्नी मुझिकल हा संगीतमय कार्यक्रम सादर केला. या लिट-फेस्टच्या समन्वयक म्हणून डॉ. सुनीता मेनॉन यांनी काम पाहिले.
याप्रसंगी प्राचार्य डॉ. व्ही. एन. सूर्यवंशी, इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. आनंदा खलाणे, आयक्यूएसी समन्वयक डॉ. प्रणव रत्नपारखी, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. विद्या पाटील उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. जितेंद्र पाटील, डॉ. गोरख जोंधळे, प्रा. शंकर भोईर, प्रा. अपर्णा कुलकर्णी, प्रा. स्वरुपा जोशी, प्रा. निम्मी कुरियन यांनी परिश्रम घेतले. हर्षवर्धन वैद्य, भक्ती सोनवणे आणि अनुश्री देशमुख यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
Editorial Team

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

5 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

5 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

5 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

5 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

5 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

5 hours ago