नाशिक

पीकविमा भरपाई न दिल्यास उपोषण

वंचित दोनशे शेतकर्‍यांचा इशारा; कंपनी प्रतिनिधींनी सर्वेक्षण केले नाही

कंधाणे : वार्ताहर
कंधाणे येथील खरीप व रब्बी 2024 हंगामातील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांनी नुकसानीची तक्रार दाखल केली असताना, कंपनीच्या अधिकार्‍यांनी संबंधित नुकसानग्रस्त क्षेत्राची पाहणी करून पीक पंचनामा न केल्याने 200 शेतकरी हक्काच्या पीकविमा भरपाईपासून वंचित राहिले आहेत. यावर तात्काळ कारवाई न झाल्यास सोमवार(दि. 25)पासून तलाठी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा संबंधित शेतकर्‍यांनी दिला आहे. याबाबत निवेदन नाशिक विभागीय आयुक्तांना पाठविले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, गावातील दोनशेहून अधिक शेतकर्‍यांनी खरीप व रब्बी 2024 मधील नुकसानीची तक्रार ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या हेल्पलाइन क्रमांकावर 72 तासांच्या आत नोंदवली होती. त्याबाबतचा तक्रार क्रमांकही शेतकर्‍यांकडे उपलब्ध असून, पीकविमा कंपनीने गावातील मोजक्याच शेतकर्‍यांचे सर्वेक्षण करून त्यांना पीकविमा मंजूर केला. मात्र, 72 तासांच्या आत तक्रार नोंद दिलेल्या शेतकर्‍यांच्या तक्रारीची कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांकडून कोणतीही दखल घेतली नाही.
या शेतकर्‍यांच्या नुकसानीचे सर्वेक्षण केले नसल्यामुळे त्यांना नुकसानभरपाईपासून वंचित राहावे लागले आहे. यामुळे येत्या आठ दिवसांत नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना पीकविमा कंपनीने पीकविमा रक्कम न दिल्यास कृषी विभाग व पीकविमा कंपनीविरोधात सोमवारपासून कंधाणे येथील तलाठी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा वंचित शेतकर्‍यांनी दिला आहे.
या शेतकर्‍यांच्या जीविताची सर्वस्वी जबाबदारी इन्शुरन्स फायनान्स कंपनीची राहील, असेही निवेदनात नमूद केले आहे. निवेदनावर शेतकरी बाळासाहेब बिरारी, किरण पाटील, दिलीप बिरारी, मनोहर बिरारी, कारभारी बिरारी, भाऊसाहेब बिरारी, सुभाष बिरारी, भाऊराव बिरारी, बाळू बिरारी, गिरीधर बिरारी आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.

खरीप हंगामात परतीच्या पावसाने व रब्बी हंगामात झालेल्या अवकाळी पावसाने व गारपिटीने कांदा पिकाचे नुकसान झाले होते. नुकसान झालेल्या क्षेत्रातील पिकाची तक्रार 72 तासांच्या आत कंपनीच्या हेल्पलाइन क्रमांकावर नोंदवली होती. पण कंपनीने त्यांच्या प्रतिनिधींमार्फत नुकसानग्रस्त क्षेत्राची पाहणी करून पंचनामा न केल्याने आम्ही पीकविमा रकमेपासून वंचित राहिलो आहोत. आठ दिवसांत पीकविमा रक्कम न दिल्यास उपोषणास बसणार आहोत.
– बाळासाहेब बिरारी, माजी संचालक, ‘वसाका’

 

 

Gavkari Admin

Recent Posts

वाजगाव ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव एकमताने मंजूर

विविध विषयांवर चर्चा; थकबाकी वसुलीसाठी धोरण राबविण्याचा निर्णय देवळा ः प्रतिनिधी वाजगाव येथील ग्रामसभेत गावात…

4 hours ago

संवर्ग एकमधील शिक्षक 100 टक्के नेमणुकीस नकार

जानोरी ग्रामसभेत ठराव; तसा शिक्षक दिल्यास हजर न करून घेण्याचा पवित्रा दिंडोरी : प्रतिनिधी जिल्हा…

4 hours ago

गणेशोत्सवासाठी बाजारात उत्साहाचे वातावरण

शासनाच्या बंदीनंतरही सर्वत्र प्लास्टिकच्या फुलांचाच बोलबाला नाशिक ः प्रतिनिधीअवघ्या आठ दिवसांवर आलेल्या गणेश चतुर्थीसाठी बाजारपेठ…

5 hours ago

इच्छुक लागले तयारीला!

गणेशोत्सवातील राजकीय उत्सव नाशिक : प्रतिनिधी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने इच्छुकांकडून गणेशोत्सवाचा मुहूर्त…

5 hours ago

जिल्ह्यात जुलैअखेर मलेरियाचे 28 रुग्ण

आज जागतिक मच्छर दिन नाशिक : देवयानी सोनार जिल्ह्यात जानेवारी ते जुलै 2025 या सात…

5 hours ago

इमारतीच्या गळती दुरुस्तीच्या नावाखाली लाटली 1 कोटीची देयके

सिन्नर पंचायत समितीच्या बांधकाम विभागाचा प्रताप; ठेकेदार आणि अधिकार्‍यांचे संगनमत सिन्नर : प्रतिनिधी प्रशासकीय राजवटीत…

6 hours ago