नांदगाव चाळीसगाव रस्त्यावर कार दुचाकी अपघातात पती-पत्नी ठार ; दोन जण गंभीर जखमी

नांदगाव चाळीसगाव रस्त्यावर कार दुचाकी

अपघातात पती-पत्नी ठार ; दोन जण गंभीर जखमी

मनमाड :आमिन शेख

नांदगाव चाळीसगाव महामार्गावर गुरुवारी दुपारी दीड ते दोन दरम्यान कार व दुचाकीच्या अपघातात दुचाकी वरील पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली असून या दोनजण गंभीर जखमी झाले आहे अपघात इतका भीषण होता की या अपघातात दोन्ही गाड्यांचा चुरा झाला आहे अपघाताची माहिती मिळताच नांदगाव पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन जखमींना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले
चांदवड ते जळगाव हा राष्ट्रीय महामार्ग 753 जी महामार्ग असून या महामार्गावरील नांदगाव ते चाळीसगाव दरम्यान असलेल्या पिंपरखेड शिवारातील टोलनाक्याजवळ इको कार क्रमांक एम एच 20 जीके 64 57 व मोटरसायकल क्रमांक एम एच 15 बी आर 70 85 यांचा समोरासमोर भीषण अपघात झाला या अपघातात मोटरसायकल वरील भाऊसाहेब बंडू माळी वय 45 व मंगलाबाई भाऊसाहेब माळी वय 40 राहणार पिंपराळे या पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला तर मोटरसायकल चालक अमोल भाऊसाहेब माळी वय 25 वर्ष तसेच कारचालक राजेंद्र प्रताप सिंग परदेशी हे दोघे गंभीर जखमी झाले नांदगाव पोलीस ठाण्याला माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व व जखमींना उपचारासाठी नांदगाव ग्रामीण रुग्णालयात आणले येथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना अधिक उपचारासाठी मालेगाव येथे रवाना करण्यात आले इतका भीषण होता की या अपघातात दोन्ही गाड्यांचा अक्षरश चुरा झाला आहे चांदवड ते जळगाव हा महामार्ग 753 जे म्हणून ओळखला जातो या महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात आले असून या महामार्गावर अपघातांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे सदर अपघाताची नांदगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलीस निरीक्षक प्रीतम कुमार चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडे अधिक तपास करीत आहे

Bhagwat Udavant

Recent Posts

घिबली अ‍ॅपची कमाल; मशालच्या जागी कमळ!

घिबली अ‍ॅपची कमाल मशालच्या जागी कमळ! मनमाड : आमिन शेख सध्याचा जमाना डिजिटलचा आहे. दररोज…

1 day ago

नियोजित वधुचे अफेअर उघड, विवाहापूर्वीच आयकर अधिकारी असलेल्या वराने संपविले जीवन

नियोजित वधुचे अफेअर उघड विवाहापूर्वीच आयकर अधिकारी असलेल्या वराने संपविले जीवन नाशिक : प्रतिनिधी नियोजित…

1 day ago

लासलगाव येथे पटेल सॉ मिलला आग

लासलगाव येथे पटेल सॉ मिलला आग श्री सिद्ध वीर हनुमान मित्र मंडळाच्या अग्निशमन टँकर मुळे…

2 days ago

नाशिकरोडला डॉ. आंबेडकर यांची जयंती उत्साहात

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती अमाप उत्साहाने नाशिकरोड ः वार्ताहर…

4 days ago

सिन्नर तालुक्यात अपात्र शिधापत्रिका शोध मोहीम

शिधापत्रिकांची होणार तपासणी सिन्नर  प्रतिनिधी तालुक्यात तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागामार्फत बोगस व अपात्र शिधापत्रिका शोध…

4 days ago

शहरात पाण्याच्या टँकरची संख्या वाढली

80 फेर्‍या सुरू; कमी दाबाच्या पाण्यामुळे नागरिक त्रस्त नाशिक : प्रतिनिधी वाढलेल्या तापमानाबरोबर शहरातील विविध…

4 days ago