सिडको : दिलीपराज सोनार
सातपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील राजवाडा येथे पती पत्नीमध्ये झालेल्या कौटुंबिक वादातुन पतीने आपल्या पत्नीच्या मानेवर धारदार कोयत्याने वार करुन निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे या घटनेचा माहिती मिळताच सातपुर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रणजीत नलावडे यांच्यासह पोलिस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आहे
याबाबत थोडक्यात माहीती अशी की सातपुर परिसरातील राजवाडा येथे सिंधुबाई पिटे (वय ४८ )ही महिला आपल्या मुलांसोबत भाड्याने घर घेऊन रहात होती गुरूवारी रात्रीच्या सुमारास पती पत्नी यांच्यात वाद झाल्याने पतीने सिंंधुबाईच्या मानेवर धारदार कोयत्याने सपासप वार केला यात सिंधुबाई रक्ताच्या थारोळ्यात पडली यात ती मयत झाली पत्नी सिंधुबाई मयत झाल्याचे लक्षात येताच पती फरार झाला दरम्यान रात्री बारा वाजेच्या सुमारास मयत सिंधुबाईचा मूलगा घरी आल्यावर त्याची आई रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसताच त्याने तात्काळ सातपुर पोलिसांना कळविले.
दरम्यान सातपूर पोलिस तसेच सहाय्यक पोलिस आयुक्त शेखर देशमुख देखील घटनास्थळी दाखल झाले याप्रकरणी सातपुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सातपुर पोलिस करीत आहेत