कार्यशाळेत मूर्ती घडविण्याकडे नागरिकांचा कल
नाशिक ः प्रतिनिधी
चौदा विद्या चौसष्ट कलांचा अधिपती गणेशाची विविध रूपे लहानग्याबरोबर मोठेही साकारत आहे.शाडूमातीचे,गोमय,बीजगणेश अशा विविध पर्यावरणपूरक साकारण्याच्या कार्यशाळा किंवा मूर्तीच्या साच्यासह साहित्याचे पॅकेज देऊन मूर्ती घडविल्या जात आहेत. बाजारात तयार पीओपी किंवा शाडू मातीच्या मूर्तीना मागणी असली तरी घरी किंवा कार्यशाळेत तयार केलेल्या बाप्पाची क्रेझ आहे.
गणेशमूर्तीचा साचा,शाडू किंवा नदीतील माती,रंग,ब्रश,गोमय(गायीच्या शेणापासून बनविलेले सहा कप धूप) गोमय उदबदत्ती,पणत्या,कुंडी,आरती पुस्तिका आणि सीड बॉल असे किट उपलब्ध करून देण्यात आले आहे.त्यामुळे कार्यशाळेशिवाय घरच्या घरी आपल्या हाताने बाप्पा साकारण्याचा आनंद एकाच किटमध्ये मिळत असल्याने नवा टे्रंड रूजू होत आहे. लाडक्या गणरायाच्या आगमनासाठी सज्जता झाली असून गेल्या पंधरा दिवसापासून गणेशमूर्ती घडविण्याच्या कार्यशाळा घेण्यात येत आहे.
आपल्या हाताने घडविलेल्या गणेशमूर्ती स्थापन करण्यासाठी सज्ज करतांना मिळणारा आनंद अधिक असल्याचे बच्चे कंपनीबरोबर मोठ्यांनाही होत असल्याने कार्यशाळेत भाग घेणार्या विद्यार्थी आणि पालकांची संख्या अधिक असल्याचे चित्र होते.गणेशाची विविध रूपे साकारतांना अनेक साहित्याचा वापर केला जातो.पर्यावरणपूरक गणेश साकारतांना नैसगिक घटकांचा वापर करून विर्सजन करून झाल्यानंतर त्यापासून हानी न होता निर्सगातील घटक निर्सगातच विलीन करून नवनिर्मीती झाडांच्या रूपात खतांच्या रूपात पर्यावरणाला ङ्गायदा होईल अशा पद्धतीने गणेशमूर्ती साकारण्यात आल्या आहेत.गेल्या काही वर्षापासून पर्यावरणपूरक गणपती तयार करण्याचे प्रमाण वाढले आहे.
कोरानामुळे ऑनलाइनच्या वातावरणात मुलांची क्रयशक्ती कमी झाल्याचे चित्र होते. त्यामुळे गणेशमूर्ती आपल्या हाताने साकारण्यासाठी मुलांना मोबाइल पासून दूर होण्यास मदत होते. या आणि पर्यावरणपूरक साहित्यातून गणेशमूर्ती बनवितांना पर्यावरणाचा र्हासही होत नाही. असा दुहेरी आनंद मिळत असल्याने असे किट आम्ही उपलब्ध करून दिले आहेत. चांगला प्रतिसाद मिळत आहे.
– आकांक्षा जोशी
नाशिक: प्रतिनिधी केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांचा आज होणारा दौरा रद्द झाला आहे. जिल्हाधिकारी…
नवी दिल्ली: देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे निधन झालं आहे. श्वासोश्वास घेण्यासाठी त्रास…
शिंदे टोलनाक्यावर कारला आग शिंदे:प्रतिनिधी शिंदे टोल नाक्यावर सुमारे साडेसात वाजेच्या दरम्यान सिन्नर कडुन नाशिक…
नाशिक: महापालिका आयुक्त पदाबाबत मोठी घडामोड पहावयास मिळत आहे, वादग्रस्त आयुक्त अशोक करंजकर हे वैधकीय…
दिंडोरीत बनावट नोटा व प्रिंटर जप्त तिघांना अटक दिंडोरी : प्रतिनिधी शहरातील आश्रय लॉज च्या…
नाशिक: प्रतिनिधी महापालिका आयुक्त अशोक करंजकर हे वैधकीय रजेवर गेल्यानंतर त्यांच्या जागी वर्धा येथील जिल्हाधिकारी…