गर्जना फाउंडेशनचा उपहासात्मक फलक
सिडको : विशेष प्रतिनिधी
सर्वसामान्य लोकांचे जीव गेले तरी चालेल…आम्ही इथेच दुकान मांडणार! हे वाक्य आता केवळ उपरोध न राहता वास्तव बनले आहे. शहरातील काही भागांत प्रशासनाच्या आशीर्वादाने आणि पोलिसांच्या मौनामुळे बेकायदेशीर व्यवसाय, अतिक्रमणे आणि अपायकारक ठिकाणी सुरू असलेले व्यवहार थेट जनतेच्या जीवावर बेतू लागले आहेत.
गोविंदनगर परिसरातील गर्जना फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी या विषयावर जोरदार आवाज उठवला असून, त्यांनी ‘आम्ही जीव मुठीत घेऊन जगणारे नाशिककर’ अशी भूमिका घेत धोकादायक परिस्थितीचा निषेध नोंदवला आहे. दोन महिन्यांपूर्वी याच रस्त्यावर अपघात होऊन एका शिक्षिकेचा मृत्यू झाल्याची घटना अजूनही ताजी आहे.
गोविंदनगरसह अनेक भागांमध्ये सार्वजनिक रस्त्यांवरच दुकान थाटून व्यवसाय करण्यात येत आहेत. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून, अग्निशमन आणि आपत्कालीन सेवांना धोका निर्माण होत आहे. त्यातच वीज व पाण्याच्या असुरक्षित जोडण्यांमुळे नागरिकांच्या जीवितासही धोका निर्माण झाला आहे. मात्र, नाशिक महापालिका आणि पोलीस प्रशासन या बाबीकडे डोळेझाक करत असल्याचा आरोप गर्जना फाउंडेशनने केला आहे.
हे अनधिकृत व्यवहार थांबवण्याऐवजी ते सुरू राहावेत, यासाठी अप्रत्यक्ष सहकार्य दिले जात आहे का, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. आम्हाला खंबीर साथ नाशिक महानगरपालिका व पोलिस प्रशासनाची असे धाडसी वाक्य गर्जना फाउंडेशनने आपल्या पोस्टरवरून उपस्थित केले आहे.
या परिस्थितीत कोणत्याही क्षणी अपघात किंवा जीवितहानी होण्याची शक्यता नागरिक व्यक्त करत आहेत. अशा गंभीर समस्यांकडे दुर्लक्ष करणार्या यंत्रणांविरुद्ध आता जनतेच्या रोषाचा उद्रेक होण्याची शक्यता आहे.
शहर प्रशासनाने या गोष्टीची गंभीर दखल घेत, धोकादायक व्यवसाय आणि अनधिकृत अतिक्रमणांविरुद्ध तातडीने कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. अन्यथा नागरिक आंदोलनाच्या मार्गावर जाण्याचा इशारा देत आहेत.
सिन्नर ः चौथ्या श्रावणी सोमवारचे औचित्य साधून शहरासह तालुक्यातील भाविकांनी पुरातन गोंदेश्वराच्या चरणी माथा टेकवून…
प्रारूप प्रभाग रचनेत एकाची भर; 31 ऑगस्टपर्यंत हरकतींसाठी मुदत सिन्नर : प्रतिनिधी नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी…
नगरपालिकेच्या 17 प्रभागांची रचना जाहीर; 31 ऑगस्टपर्यंत हरकती मनमाड : प्रतिनिधी गेल्या अनेक वर्षांपासून डोळे…
त्र्यंबकेश्वर : वार्ताहर त्र्यंबकेश्वर येथे स्वातंत्र्यदिनासह सलग शासकीय सुट्ट्यांनी गर्दीचा महापूर आला. येथील व्यवस्था कोलमडून…
नाशिकमधील वाढती गुन्हेगारी, एमडी ड्रग, रस्त्यावरील खड्ड्यांविरोधात उठविणार आवाज नाशिक : प्रतिनिधी शहरातील वाढत्या गुन्हेगारीविरोधात…
एक लाख 75 हजारांचा मुद्देमाल जप्त नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी नाशिक शहर गुन्हे शाखेच्या अमली…