मंत्री गिरीश महाजन : सुनील बागूल, राजवाडे यांचा अखेर भाजपमध्ये प्रवेश
नाशिक ः प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षात प्रवेशासाठी सध्या गर्दी वाढत आहे. मात्र, आता बस्स करावे. पक्षात जागा हाउसफुल झाली आहे. महापालिका निवडणुकांत मागच्या वेळी भाजपने 65 जागा जिंकल्या होत्या. आता येणार्या निवडणुकांत 122 पैकी 100 चा आकडा पार करायचा आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी एकसंघ व्हा. विरोधकांकडे मुद्दे नाहीत. सकाळच्या पोपटपंचीला जनता व त्यांच्या पक्षातीलच कार्यकर्ते कंटाळले आहेत, असे जलसंपदामंत्री गिरीश महाजन म्हणाले.
रविवारी (दि.27) शिवसेना ठाकरे गटाचे माजी उपनेते सुनील बागूल व त्यांच्या समर्थकांनी जलसंपदामंत्री महाजन यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. या प्रवेशावेळी मंत्री महाजन यांनी बागूल यांना हा शेवटचा पक्षप्रवेश मानावा. यापुढे पर्यायांचा विचार नका, असा सूचक सल्ला देत भाजप हाउसफुल झाल्याचे त्यांनी सांगितले.
शहरातील गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात झालेल्या या भव्य पक्षप्रवेश सोहळ्यात चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण, नाशिक मध्यच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे, पश्चिमच्या आमदार सीमा हिरे, आमदार अॅड. राहुल ढिकले, भाजप शहराध्यक्ष सुनील केदार, जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव, माजी आमदार बाळासाहेब सानप, लक्ष्मण सावजी, माजी मंत्री बबनराव घोलप, भिकूबाई बागूल, सुधाकर बडगुजर आदी नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी सुनील बागूल यांच्यासोबत मामा राजवाडे, शंभू बागूल, भगवंत पाठक, गुलाब भोये, जगदीश अपसुंदे यांच्यासह साठहून अधिक पदाधिकारी व शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपचे कमळ हाती घेतले.
भाजपमध्ये सध्या राजकीय स्थलांतराची लाट सुरू आहे; परंतु या लाटेवर मर्यादा ठरवत महाजन यांनी हाउसफुलचा इशारा दिला आहे. सुनील बागूल यांच्यासारख्या दिग्गजांचा प्रवेश व कार्यकर्त्यांची पाठराखण भाजपसाठी स्थानिक निवडणुकांमध्ये फायदेशीर ठरण्याच्या शक्यतेमुळे भाजप आता हाउसफुल झाल्याचे महाजन यांनी स्पष्ट केले.
सुनील बागूल यांनी प्रवेशाबाबत अनुभव सांगताना आमदार, पदाधिकारी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, उमेदवाराची पार्श्वभूमी, लोकांचा कल आदी सर्व तपासूनच पक्षप्रवेश केला जातो. त्यामुळे आता पक्षशिस्त व प्रवेशासाठीची प्रक्रिया अधिक कठोर झाल्याचे बागूल यांनी सांगितले.
बागूल यांना तंबी
सुनील बागूल यांच्या पक्षप्रवेशाच्या वेळी बोलताना मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणात तंबी देताना, सुनील बागूल यांनी यापुढे कुठेही जायचे नाही. पक्षांतर करायचे नाही, अशी तंबी दिली. पक्षप्रवेशावेळी कार्यकर्त्यांनी घोषणा देत मंत्री महाजनांना यावेळी बागूलांना पक्षात उच्च स्थान देण्याबाबत विनंती केली. त्यावेळी पूर्वी पद दिले नव्हते का? असे सांगत महाजन यांनी समर्थकांना टोला लगावला.
गितेंना लगावला टोला
मंत्री महाजन यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्यांच्यावर टीका करणे टाळले. मात्र, भाषणात बोलताना आता उबाठाचे कोण गिते महानगरप्रमुख आहेत. त्यांना कोणत्याही परिस्थितीत भाजपात प्रवेश देणार नाही, असे म्हणत वसंत गिते यांना टोला लगावला.
एमपीएससी उत्तीर्ण झाल्यासारखे वाटते ः बागूल
आपल्या भावना व्यक्त करताना सुनील बागूल म्हणाले, आज भाजपमध्ये प्रवेश करणे सोपे राहिलेले नाही.आता प्रवेश करण्यापूर्वी आमदारांची ना हरकत, तसेच पार्श्वभूमी, लोकांचा कल आदी सर्व तपासूनच प्रवेश दिला जातो. पक्षप्रवेश आणि पक्षशिस्त महत्त्वाची आहे. मंत्री महाजन यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी विचारले की, स्थानिक आमदार, पदाधिकारी व संघटनेचे ना हरकत प्रमाणपत्र आहे का? मी परवानगी घेऊन आलो आहे, असे सांगितल्यावरच प्रवेशाची परवानगी मिळाली. त्यामुळे हा प्रवेश एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्यासारखा वाटतोय. आता जनतेसाठी भरपूर काम करायचे असल्याचे बागूल यांनी सागितले.
खासदार संजय राऊत यांच्यावर नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नांदगाव आमिन शेख शिवसेना उद्धव बाळासाहेब…
मुलींचा सांभाळ करण्याचा कंटाळा आल्याने आईने उचलले भयानक पाऊल शहापूर : साजिद शेख शहापूर…
मंत्री गिरीश महाजन यांचा एकनाथ खडसे यांना सवाल नाशिक : प्रतिनिधी पुण्यात रेव्ह पार्टीवर पोलिसांनी…
दि. 27 जुलै ते 2 ऑगस्ट 2025 पुरुषोत्तम नाईक मेष : आप्तेष्टांच्या गाठीभेटी या सप्ताहात…
दक्षिण भारत, मध्य प्रदेशातील कांद्याच्या आवकेने भाव गडगडण्याची शक्यता लासलगाव : समीर पठाण गेल्या काही…
नाफेडने जाहीर केले नवे कांदा खरेदी दर लासलगाव :- समीर पठाण गेल्या महिन्यापासून नाफेडच्या माध्यमातून…