नाशिक

जिल्ह्यात पोलिओच्या अतिरिक्त डोस ची  अंमलबजावणी

 

नाशिक : प्रतिनिधी

जिल्हा परिषद आरोग्य विभाग नाशिक आता नियमित लसीकरणांमध्ये पोलिओचा अतिरिक्त डोस देणार F-IPV(इन ऍक्टिव्हेटेड पोलिओ वायरस)चा नियमित लसीकरण अंतर्गत बालकास जन्मनंतर सहा आठवडे पूर्ण झाल्यावर पहिला डोस तसेच चौदा आठवडे पूर्ण झाल्यावर दुसरा डोस असे एकूण दोन डोस देण्यात येत आहेत. तथापि शासनाच्या मार्ग दर्शक सूचनानुसार  1 जानेवारी 2023 पासून F-IPVतिसरा डोस बालकास नऊ महिने पूर्ण झाल्यावर देण्यात येणार आहे सदर  लसीकरणाचा उद्देश हा पोलिओ  उद्रेकाची व्याप्ती मर्यादित ठेवणे तसेच समाजामध्ये सामूहिक  प्रतिकार शक्ती वाढविणे असा आहे.

 

केंद्र व राज्य सरकारच्या मार्गदर्शनानुसार माहे जानेवारी 2023 पासून हा तिसरा डोस  नियमित लसीकरणात समाविष्ट करण्यात येत आहे हा f- IPV लस्सीचा तिसरा डोस बालकास  नऊ महिने पूर्ण झाल्यावर देण्यात येणार आहे सदर डोस नऊ ते बारा महिने या वयोगटातील गोवर रूबेला लसीच्या पहिल्या डोस बरोबर देण्यात येणार आहे याबाबत आरोग्य विभागातील सर्व स्तरावर प्रशिक्षण  देण्यात आलेले आहेत तरी सर्व पालकांनी डोस मधील बदल लक्षात घेऊन आपल्या मुलांचे वयोगटा प्रमाणे बालकांना त्यांच्या वयाच्या सहा आठवडे पूर्ण झाल्यावर 14 आठवडे पूर्ण झाल्यावर आणि नऊ महिने पूर्ण झाल्यानंतर पहिला दुसरा व तिसरा असे तीन डोस जवळच्या लसीकरण केंद्रावर जाऊन लसीकरण करून घ्यावे असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी   अशीमा मित्तल , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ हर्षल नेहते, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ  कैलास भोये,अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ युवराज देवरे,डॉ सचिन खरात सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी केले आहे.

 

 

Ashvini Pande

Recent Posts

जयंत पाटील अखेर प्रदेशाध्यक्षपदावरून पाय उतार

जयंत पाटील अखेर प्रदेशाध्यक्ष पदावरून पाय उतार शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष नाशिकरोड : प्रतिनिधी राष्ट्रवादी…

9 hours ago

नाशिक जिल्हा परिषदेच्या त्या अधिकाऱ्यावर अखेर निलंबन कारवाई, लैंगिक छळ केल्याच्या तक्रारींची दखल

नाशिक प्रतिनिधी नाशिक जिल्हा परिषदेमधील एका वरिष्ठ विभागप्रमुखावर तब्बल ३० महिला कर्मचाऱ्यांनी लैंगिक शोषणाच्या तक्रारी…

1 day ago

येरे येरे पैसा ३’ मधील ‘उडत गेला सोन्या’ हे ‘जेन झी’ ब्रेकअप साँग प्रदर्शित

ईशान अमेय खोपकरचे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण! ‘येरे येरे पैसा ३’ मधील ‘उडत गेला सोन्या’ हे…

3 days ago

मासिक पाळी तपासण्यासाठी विद्यार्थिनींसोबत केले असे काही… कुठे घडला नेमका हा प्रकार?

मासिक पाळी तपासण्यासाठी विद्यार्थिनींसोबत केले असे काही... कुठे घडला नेमका हा प्रकार? शहापूर : प्रतिनिधी…

3 days ago

मनमाड-इंदूर रेल्वेमार्गासाठी भूसंपादनाला गती

मालेगाव, नांदगाव तालुक्यांतील 21 गावांतील शेतकर्‍यांना नोटिसा मालेगाव : नीलेश शिंपी गेली अनेक वर्षे प्रतीक्षेत…

4 days ago

जातो माघारी पंढरीनाथा…

महाराष्ट्रातूनच नाही, तर जगभरातून साधारण महिन्यापासून विठुरायाचा वारकरी आषाढी वारीच्या निमित्ताने पायी वारीत निघाला होता.…

4 days ago