आस्वाद

आयातोल्ला अली खामेनेई

इराणच्या राजकारणातील प्रभावशाली नेतृत्वाचा अंत

आयातोल्ला अली खामेनेई यांचा जन्म 19 एप्रिल 1939 रोजी इराणमधील मशहद येथे एका धार्मिक कुटुंबात झाला. लहानपणापासूनच त्यांना इस्लामिक धर्मशास्त्राचे शिक्षण मिळाले. पुढे त्यांनी कुम येथे शिया इस्लामिक धर्मशास्त्राचा सखोल अभ्यास केला. त्या काळात इराणमध्ये राजेशाही शासन होते आणि देशावर मोहम्मद रजा फेलवी यांचे राज्य होते.
शाह यांच्या राजवटीविरोधात अनेक धार्मिक नेत्यांनी आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनाचे नेतृत्व प्रसिद्ध धर्मगुरू आर. खेमनेई यांनी केले. खामेनेई हे खोमेनी यांच्या विचारसरणीने प्रभावित झाले आणि त्यांनी शाहविरोधी आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. या कारणामुळे त्यांना अनेक वेळा अटक आणि तुरुंगवासही भोगावा लागला.
इस्लामिक क्रांतीतील भूमिका
1979 साली इराणमध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाली. या घटनेला ’इराण क्रांती’ असे म्हटले जाते. या क्रांतीमुळे इराणमधील राजेशाहीचा अंत झाला आणि देशात इस्लामिक प्रजासत्ताकाची स्थापना झाली. या क्रांतीनंतर खामेनेई यांची राजकीय कारकीर्द वेगाने पुढे जाऊ लागली. क्रांतीनंतर त्यांनी विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले. ते क्रांतिकारी परिषदेचे सदस्य होते आणि देशाच्या संरक्षणविषयक धोरणांमध्येही त्यांचा प्रभाव वाढत गेला.
राष्ट्रपती म्हणून कार्यकाळ
1981 साली खामेनेई यांची इराणच्या राष्ट्रपतिपदी निवड झाली. त्या काळात देशासमोर अनेक आव्हाने होती. विशेषतः इराण- इराक संघर्ष. या युद्धामुळे देशाची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती कठीण झाली होती. 1981 ते 89 या काळात त्यांनी राष्ट्रपती म्हणून काम केले. या काळात त्यांनी देशातील राजकीय स्थैर्य टिकवण्याचा प्रयत्न केला. तसेच इस्लामिक क्रांतीच्या विचारसरणीला बळकटी देण्यावर त्यांनी भर दिला. 1985 मध्ये त्यांची पुन्हा राष्ट्रपती म्हणून निवड झाली.
सुप्रीम लीडर म्हणून दीर्घकालीन नेतृत्व
1989 साली खामेनेई यांची इराणच्या सर्वोच्च नेत्याच्या पदावर निवड केली. इराणच्या राजकीय व्यवस्थेत सुप्रीम लीडर हे सर्वांत प्रभावशाली पद मानले जाते. या पदावर असताना देशाच्या सैन्यदलांवर, न्यायव्यवस्थेवर आणि परराष्ट्र धोरणांवर त्यांचे अंतिम नियंत्रण होते. राष्ट्रपती आणि संसद या लोकशाही संस्थांपेक्षा सुप्रीम लीडरचे अधिकार अधिक प्रभावी मानले जातात.
परराष्ट्र धोरण आणि अणुकार्यक्रम
खामेनेई यांच्या नेतृत्वाखाली इराणने पश्चिमी देशांविषयी, विशेषतः अमेरिकेविषयी कठोर भूमिका घेतली. तसेच इराण आणि इस्रायल यांच्यातील तणावही कायम राहिला. त्यांनी अनेक वेळा इस्रायलविरोधी भूमिका व्यक्त केली. त्यांच्या नेतृत्वात इराणने आपला अणुकार्यक्रमही पुढे नेला. या कार्यक्रमामुळे अमेरिका आणि इतर पाश्चिमात्य देशांशी इराणचे संबंध अधिक ताणले गेले. परिणामी इराणवर अनेक आर्थिक निर्बंध लादण्यात आले.
अंतर्गत राजकारण
खामेनेई यांच्या दीर्घकालीन नेतृत्वात इराणमध्ये अनेक आंदोलनही झाली. 2009 मधील निवडणुकांनंतर झालेल्या आंदोलनाने सरकारसमोर मोठे आव्हान निर्माण केले. तसेच महिलांच्या हक्कांशी संबंधित आंदोलनांनीही आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठे लक्ष वेधले. सरकारने या आंदोलनांवर कठोर कारवाई केली, त्यामुळेमानवाधिकारांच्या प्रश्नावर इराणवर आंतरराष्ट्रीय स्तरावर टीका करण्यात आली. आयातोल्ला अली खामेनेई हे आधुनिक इराणच्या राजकारणातील अत्यंत प्रभावशाली नेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वामुळे इराणने इस्लामिक क्रांतीची विचारसरणी टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला आणि मध्यपूर्वेतील राजकारणात स्वतंत्र भूमिका निर्माण केली. त्यांच्या मृत्यूनंतर इराणमध्ये नेतृत्व बदलाची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता असून, त्याचा परिणाम केवळ इराणपुरता मर्यादित राहणार नाही. उलट पश्चिम आशियातील सामरिक समीकरणांवरही त्याचा दूरगामी प्रभाव पडण्याची शक्यता आहे. मध्यपूर्व आशियामध्ये असलेल्या इराणच्या समरीक आणि राजकीय प्रभावाच्या जडणघडणीमध्ये त्यांची भूमिका नाकारणे शक्य नाही अमेरिका आणि इस्रायल यांच्या कडव्या विरोधाला आणि प्रचंड आर्थिक निर्बंधांना तोंड देत त्यांनी कित्येक वर्षे इराणची सत्ता संभाळली. त्यांचे जाणे हे केवळ इराणसाठी नाही, तर मध्यपूर्व आशियाच्या राजकीय स्थैर्यासमोर मोठी पोकळी निर्माण करून गेले आहे, ज्याचा परिणाम आपण युद्धाच्या रूपाने बघत आहोत.

Importance Ali Khamenei

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

9 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

9 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

9 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

9 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

9 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

9 hours ago