भगर/वरईचे महत्त्व

मिलेट्स किचन

भगर/वरईचे महत्त्व

लेखक: सोनाली कदम, कृषी सहायक

वरई किवा भगर हि कॅल्शियम व फॉस्फरसचा मोठा स्त्रोत असून व्हिटामिन बी ३ मोठ्या प्रमाणावर आहे. खनिज संपन्न असणाऱ्या भगरीमुळे हाडाना बळकटी मिळते. ग्लुटेन नसल्यामुळे भगरीमध्ये कमी कैलरी असतात. तसेच साखरेचे प्रमाण कमी असल्याने अतिलठ्ठपणा कमी करण्यास भगरीचे सेवन करणे फायदेशीर ठरते. मधुमेहावर हि भगर गुणकारी आहे. भगरीमध्ये विविध प्रकारचे गुणधर्म पाहायला मिळतात.भगरीमध्ये प्रथिने चे प्रमाण भरपूर असते. तांदूळ, गहू, ज्वारी या धान्यापेक्षा भगरीत कॅलरी कमी असतात.
1.प्रथिने-
जास्त प्रमाणात प्रोटीन असल्यामुळे थोडीशी भगर खाऊन सुद्धा शरीरात शक्ती येते. कॅलरी कमी असल्यामुळे वजन आटोक्यात ठेवण्यासाठी सुद्धा भगर उपयुक्त ठरते.

2. फायबर रिच फूड भगरीत फायबर खूप जास्त प्रमाणात आढळतात. आपण खाल्लेल्या अन्नाचे पचन व्हायला फायबरची गरज असते. म्हणूनच आहारात फायबरचे प्रमाण जास्त असेल तर पचनाच्या तक्रारी कमी होतात.लवकर अन्नपचन होते. 3 लोह – भगरीत लोह जास्त प्रमाणात आढळते. म्हणूनच आपल्याला जर ऍनेमियाचा त्रास (शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असणे) असेल तर शरीरातले हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवण्यासाठी भगर उपयोगी आहे.इतर कोणत्याही धान्यात असते त्यापेक्षा जास्त प्रमाणात लोह भगरीतून मिळते. साधारण 100 ग्राम भगरीतून 18.5 mg लोह मिळते. विशेषतः शाकाहारी लोकांसाठी भगर हा लोहाचा चा सर्वोत्तम स्रोत आहे. असे अनेक महत्त्वपूर्ण गुणधर्म असुनही आपल्याकडे भगर फक्त उपवासालाच खाल्ली जाते.पण असे न करता आपण दैनंदिन आहारामध्ये देखील भगरीचा विविध पदार्थ बनवून समावेश करावा. वरईची / भगरीची खीर

साहित्य:

१ वाटी वरई, पाव चमचा ईलायची पावडर, २ चमचे आवडता सुकामेवा, ४ चमचे साखर, २५० मिली दुध

कृती:
१ वाटी वरई स्वच्छ धुवून १ तास भिजवावी व नंतर मिक्सर मधून दळून घ्यावी. १ पातेले गरम करून त्यात २ चमचे साजूक तूप घालून घ्यावे. त्यात सुका मेवा परतून घ्यावा. त्यात वरील मिश्रण व दुध घालून ढवळून घ्यावे. १ उकळी काढून घ्यावी. त्यात साखर, ईलायची पावडर घालून ५ मिनटे शिजवून घ्यावे. गरम गरम खीर उपवासासाठी व इतर वेळी देखील खाण्यासाठी अतिशय चविष्ट लागते *वरईचा / भगरचा उपमा*

साहित्य :-

१ वाटी भगर, २ हिरव्या मिरच्या, बटाटा पाव चमचा जिरे-मोहरी,१ वाटी गाजर, घेवडा, वाटणा, चवीपुरते मीठ, २ चमचे तेल

कृती :-

प्रेशर कुकर गरम करून त्यात तेल टाकून जिरे मोहरीची फोडणी द्यावी, चिरलेली हिरवी मिरची व वरील सर्व भाज्या परतून घ्याव्यात भगर स्वच्छ धुवून त्यात परतून घ्यावी गरजेनुसार पाणी व चवी पुरते मीठ टाकून २ शिट्या करून करून घ्याव्यात. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गरम गरम खायला घ्यावा. *वरईचे / भगरीचे भजे*

साहित्य:

१ वाटी वरई/भगर, १ चमचा हिरवी मिरची पेस्ट, २ चमचे साबुदाणा, चवीपुरते मीठ, तळण्यासाठी तेल

कृती:

१ वाटी भगर व २ चमचे साबुदाणा २ तास भिजवून घ्यावा. नंतर त्याची मिक्सर मधून घट्टसर पेस्ट करून घ्यावी. त्यात चवीपुरते मीठ व हिरवी मिरची पेस्ट घालून एकजीव करावे. कढईत तेल गरम करून भजी तळून घ्यावी. गरम गरम भजी तळलेल्या हिरव्या मिरची सोबत अतिशय खमंग आणि रुचकर लागतात.

 

श्रीमती सोनाली कदम,कृषी सहाय्यक

Bhagwat Udavant

Recent Posts

घिबली अ‍ॅपची कमाल; मशालच्या जागी कमळ!

घिबली अ‍ॅपची कमाल मशालच्या जागी कमळ! मनमाड : आमिन शेख सध्याचा जमाना डिजिटलचा आहे. दररोज…

17 hours ago

नियोजित वधुचे अफेअर उघड, विवाहापूर्वीच आयकर अधिकारी असलेल्या वराने संपविले जीवन

नियोजित वधुचे अफेअर उघड विवाहापूर्वीच आयकर अधिकारी असलेल्या वराने संपविले जीवन नाशिक : प्रतिनिधी नियोजित…

1 day ago

लासलगाव येथे पटेल सॉ मिलला आग

लासलगाव येथे पटेल सॉ मिलला आग श्री सिद्ध वीर हनुमान मित्र मंडळाच्या अग्निशमन टँकर मुळे…

2 days ago

नाशिकरोडला डॉ. आंबेडकर यांची जयंती उत्साहात

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती अमाप उत्साहाने नाशिकरोड ः वार्ताहर…

3 days ago

सिन्नर तालुक्यात अपात्र शिधापत्रिका शोध मोहीम

शिधापत्रिकांची होणार तपासणी सिन्नर  प्रतिनिधी तालुक्यात तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागामार्फत बोगस व अपात्र शिधापत्रिका शोध…

3 days ago

शहरात पाण्याच्या टँकरची संख्या वाढली

80 फेर्‍या सुरू; कमी दाबाच्या पाण्यामुळे नागरिक त्रस्त नाशिक : प्रतिनिधी वाढलेल्या तापमानाबरोबर शहरातील विविध…

3 days ago