62 व्या राज्य नाट्य स्पर्धेत  नाशिक केंद्रात  ‘रा+धा’ प्रथम

 

नाशिक :प्रतिनिधी
६२ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठ ी नाट्य स्पर्धेत नाशिक केंद्रातून नाट्यभारती, इंदौर या संस्थेच्या रा+धा या नाटकाला प्रथम पारितोषिक तसेच महात्मा गांधी विद्यामंदिर, पंचवटी, न ाशिक या संस्थेच्या चोरीला गेलाय या नाटकास द्वित ीय पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालक  विभीषण चवरे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे  केली आहे. या दोन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठीही निवड करण्यात आली आहे.
यांना मिळाले पारितोषिक
संक्रमण युवा फाऊंडेशन, नाशिक या संस्थेच्या खेळ मांडियेला या नाटकासाठी तृतीय  पारितोषिक प्राप्त झाले आहे.
दिग्दर्शन प्रथम पारितोषिक श्रीराम जोग( रा+धा), द्वितीय पारितोषिक स्वप्नील गायकवाड  (च ोरीला गेलाय)
 प्रकाश योजना प्रथम पारितोषिक श्याम चव्हाण (खेळ मांडियेला) , द्वितीय पारितोषिक  विनोद राठोड -(चोरीला गेलाय),
नेपथ्य  प्रथम अनिरुध्द किरकिरे (राधा), द्वितीय पारितोषिक दीपक चव्हाण (आपुलाची वाद आपणाशी) ,
 रंगभूषा प्रथम पारितोषिक माणिक कानडे (युद्धविराम, द्वितीय पारितोषिक ललित कुलकर्णी  (आप ुलाची वाद आपणाशी ),
उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक लक्ष ्मी पिंपळे -युध्दविराम व सचिन रहाणे -द कॉन्शस,
 अभिनयासाठी   गुणवत्ता प्रमाणपत्रे श्रृतिका जोग कळमकर -रा+धा, अपूर्णा क्षेमकल्याणी -खेळ मांडिय ेला , सुमन शर्मा -कुस बदलताना,मानसी स्वप्ना- प्रथम पुरुष, मैत्रेयी गायधनी- स्मरणार्थ, स ुयोग कुळकर्णी – मुंबई मान्सुन, भरत कुळकर्णी -ही कशानं धुंदी आली , सुशील सुर्वे – प्रथम पुरुष,  प्रतीक बर्वे -चोरीला गेलाय , प्रविण तिवडे-  आपुलाची वाद आपणाशी यांना पारितोषिक मिळाले.
दि. २० नोव्हेंबर ते १३ डिसेंबर या कालावधीत परशुराम साईखेडकर नाट्यगृह, नाशिक येथे झालेल्या  स्पर्धेत एकूण २२ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले, स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून . संजय भाकरे, . योगेश शुक्ल आणि  अर्चना कुबेर यांनी काम पाहिले.
सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव  विकास खारगे यांनी विजेत्यांचे अभिनंदन केलेले आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री. सुधीर मुनगंटीवार यांनी प्रथम व  नाटकाच्या संघाचे तसेच इतर पारितोषिक प्राप्त कलाकारांचे अभिनंदन केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *