मालेगावात शहरात कूत्ता गोळींचा साठा जप्त

नाशिक ग्रामीण पोलीसांची कारवाई
मालेगाव:प्रतिनिधी
मालेगाव शहरातील कुत्ता गोळीचे ग्रहण मिटता मिटे ना झाले असून पोलिसांची कारवाई सुरूच आहे. शहरातील अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांचे आदेशान्वये पोलीस ठाणे निहाय कारवाया सुरूच आहेत.मालेगाव शहरात गुंगी आणणाऱ्या औषधी गोळ्यांची अवैधरित्या विक्री होत असल्याबाबत मालेगाव कॅम्प उपविभाग सहा.पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू,  यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरुन आझादनगर पोलीस ठाण्याच्या पो.उ.नि रूपाली महाजन कळविल्यानंतर त्यांनी पोलीस अंमलदारांच्या मदतीने दिनांक ०६जानेवारीला मालेगाव शहरातील न्यू मदनीनगर भागात अवैधरित्या औषधी गोळयांची विक्री करणाऱ्या रईस शहार उर्फ शहा, वय ३२, रा. सलामताबाद, मालेगाव याचेवर छापा टाकून त्याचे कब्जातून गुंगीकारक औषधी गोळ्यांच्या २८० स्ट्रीप १०,०८० रू. की. चा मुद्देमाल जप्त केला आहे.
त्याचा साथीदार मुज्जमील, रा. धुळे याचेसह मालेगाव शहरात विनापरवाना वैद्यकिय क्षेत्राचे कोणतेही ज्ञान नसतांना स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी मानवी मनोव्यापारावर परिणाम करणा-या गुंगीकारक औषधी गोळ्यांची विक्री करतांना मिळून आल्याने त्यांचेविरुध्द आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ०२/ २०२३ भादवि कलम ३२८, २७६ तसेच एन.डी.पी. एस. कायदा १९८५ चे कलम २२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रईस शहार उर्फ शहा यास अटक करण्यात आली असून अधिक तपास आझादनगर पोलीस ठाण्याचे पोउनि श्री. तागड हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *