निमगाव वाकडा शिवारात एकाच रात्री दोन घरफोड्या ७३ हजार ६०० रुपयांचा ऐवज लंपास

लासलगाव:    समीर पठाण

लासलगाव जवळील निमगाव वाकडा शिवारात मंगळवारी मध्यरात्री पावणे दोन वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी फिर्यादीच्या घराचा लोखंडी दरवाजाला असलेली कडी हात घालुन उघडुन व आतील दरवाजा लोटुन घरात प्रवेश करून 73,600 रुपये किमतीचे सोन्याचे व चांदीचे दागिने मिळून चोरून पोबारा केल्याची घटना घडल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी मध्यरात्री पावणे दोन वाजेच्या सुमारास फिर्यादी प्रकाश भाऊसाहेब गायकर राहणार निमगाव वाकडा यांच्या घराचा लोखंडी दरवाजाला असलेली कडी अज्ञात चोरट्यांनी हात घालुन उघडुन व आतील दरवाजा लोटुन घरात प्रवेश केला व फिर्यादीस व त्यांच्या वडीलांना लोखंडी गज व सुरी सारख्या दिसनाऱ्या लोखंडी वस्तुचा धाक दाखवुन त्यांचे घरातील लोखंडी पत्र्याच्या कोठीतील एकुण 73,600 / – रु किंमतीचे सोन्या चांदीचे दागीने जबरी चोरी करुन चोरुन नेले तसेच फिर्यादीचे घरापासून काही अंतरावर राहणारे साक्षीदार रमेश रामभाऊ कोटकर यांच्या घरीही चोरट्यांनी सोन्याच्या दागिन्यांच्या मोठ्या रकमेची चोरी करून पोबारा केला

या घटनेची माहिती मिळताच लासलगाव पोलीस ठाण्याचे स पो नि राहुल वाघ हे पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले.या घटनेचा पुढील तपास स पो नि राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पो उ नि अजिनाथ कोठाळे व सपोउनि एल.के.धोक्रट करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *