सदगुरुनगर परिसरात गुंडांकडून कोयते नाचवत दहशतीचा प्रयत्न
इमारतीतील काचा फोडून रहिवाशांना शिवीगाळ
सातपूर : प्रतिनिधी
सदगुरूनगर परिसरात शनिवारी रात्री १०.१५ च्या सुमारास गुंडांनी हातात कोयता नाचवत गोंधळ घातला. सद्गुरू नगर या भागातील काठे अपार्टमेंट या इमारतीवर तसेच एका दुकानावर दगडफेक केली. यात या इमारतीतील घरांच्या काचा फुटल्या. जुन्या वादातून एका युवकाला मारहाण करण्यासाठी हे गुंड आले होते. मात्र हा युवक न मिळाल्याने या गुंडांनी परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी दगडफेक केली.
दरम्यान,ही माहिती कळताच पोलिसांनी धाव घेत तपास सुरु केला, रात्री उशिरापर्यंत याबाबत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जुन्या वादाची कुरापत काढत हे गुंड समीर सय्यद नामक युवकास मारण्यासाठी दुचाकीने संत कबीरनगर परिसरात गेले होते. तिथे हा युवक न मिळाल्याने त्याचा मित्र आव्हाड (रा. सद्गुरूनगर) याला शोधत ते सद्गुरूनगरात आले. मात्र तोही न मिळाल्याने या गुंडांनी हातातील कोयते नाचवले तसेच परिसरातील घरांवर दगडफेक केली. दुचाकीवरून जाताना रात्री शतपावली करणाऱ्या येथील रहिवाशांनाही कोयता दाखवत शिवीगाळ केली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज मिळवत सातपूर पोलिस तपास करत आहेत.
दरम्यान, या घटनेची माहिती कळाल्याने आमदार सीमाताई हिरे यांनी देखील सद्गुरूनगर येथील काठे निवास इमारत याठिकाणी भयभीत झालेल्या स्थानिक महिलांना भेट देऊन पाहणी केली…
एसी लोकलमध्ये प्रवाशाचा चक्क छत्री उघडून प्रवास शहापूर : साजिद शेख लोकल ही मुंबईतल्या प्रवाशांची…
ह्मलोकेषु ये सर्पा शेषनाग परोगमा:। नमोस्तुतेभ्य: सर्पेभ्य: सुप्रीतो मम सर्वदा॥ ब्रह्मलोकामधील सर्व सर्पांचा राजा नागदेव…
यंदा राख्यांना महागाईची वीण नाशिक : प्रतिनिधी बहीण-भावाच्या नात्याची वीण घट्ट करणारा रक्षाबंधन सण दहा…
पहिल्याच श्रावणी सोमवारी शिवालये गर्दीने फुलली नाशिक : प्रतिनिधी श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी महादेव मंदिरांत…
महापालिकेच्या कामाचे पितळ उघडे; नागरिकांत नाराजी इंदिरानगर : वार्ताहर पाथर्डी फाटा प्रभाग क्रमांक 31 मधील…
मुंबई: विधानसभेत रमी खेळत असल्याच्या मुद्द्यावरून जोरदार टीका झाल्यामुळे चर्चेत आलेले कृषी मंत्री माणिकराव कोकाटे…