पंचवटी : वार्ताहर
नाशिक शहरात सातपूर , अंबड पाठोपाठ पंचवटी परिसरात एकाचा खून दगडाने ठेचून खून केल्याची घटना घडली असून पंचवटी पोलिसांनी घटना स्थळी धाव घेतली आहे.दरम्यान मयताचा चेहरा पूर्णपणे ठेचल्याने मयताची ओळख पटणे अवघड झाले आहे.
पंचवटीतील समर्थ नगरच्या समोर हमालवाडी पाटा लगत सदरची घटना सकाळी ८ ; ३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. याबाबतची घटना पोलिसांना कळताच सहायक पोलिस आयुक्त सीताराम गायकवाड, पंचवटी पोलिस ठाणे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सिताराम कोल्हे यांचे सह अधिकारी कर्मचारी घटना स्थळी दाखल झाले आहेत . मयताचा चेहरा दगडाने ठेचल्याने मयताची ओळख पटणे अवघड आहे. पोलिसांनी स्थानिक नागरिकांना ओळख पटविण्यासाठी बोलावले तरी देखील ओळख पटली नाही . मयत अंदाजे तीस ते पस्तीस वयोगटातील असल्याचा पोलीसांचा अंदाज असून मयताची ओळख पटल्यानंतरच खुनाचा उलगडा होईल .