जुन्या नाशकात जाळपोळ करणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या
दहशत माजवण्यासाठी जाळली वाहने
नाशिक: प्रतिनिधी
जुने नाशिक भागात दहशत निर्माण करण्यासाठी वाहने जाळणाऱ्या समाजकंटक जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. यातील तिघांना शनिशिंगणापूर येथून ताब्यात घेतले आहे,यातील फरार असलेल्या इतर संशयित आरोपींना शोधण्यासाठी पोलीस युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत, सनी गावडे, रा.म्हसरूल, प्रशांत फड, मखमलाबाद, रवी कराटे,रा. विद्या नगर, आकाश साळुंखे, रा. सिडको, विजय लोखंडे, रा. आडगाव अशा पाच जणांना अटक करण्यात आली आहे. 16 मे रोजी पहाटे साडे तीन च्या सुमारास9 मोटारसायकल, 1ट्रक,1 टेम्पो पेटवून दिला होता, घटना घडल्या नंतर जनतेत रोष होता, मात्र पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपआयुक्त किरण चव्हाण, सिद्धेश्वर धुमाळ, पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील , संतोष नरुटे यांच्या मार्गदर्शनाखाली भद्रकाली पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांनी शोध घेऊन संशयित आरोपींना अटक केली आहे, इतर आरोपींना शोधण्याचे काम सुरू आहे
घिबली अॅपची कमाल मशालच्या जागी कमळ! मनमाड : आमिन शेख सध्याचा जमाना डिजिटलचा आहे. दररोज…
नियोजित वधुचे अफेअर उघड विवाहापूर्वीच आयकर अधिकारी असलेल्या वराने संपविले जीवन नाशिक : प्रतिनिधी नियोजित…
लासलगाव येथे पटेल सॉ मिलला आग श्री सिद्ध वीर हनुमान मित्र मंडळाच्या अग्निशमन टँकर मुळे…
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती अमाप उत्साहाने नाशिकरोड ः वार्ताहर…
शिधापत्रिकांची होणार तपासणी सिन्नर प्रतिनिधी तालुक्यात तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागामार्फत बोगस व अपात्र शिधापत्रिका शोध…
80 फेर्या सुरू; कमी दाबाच्या पाण्यामुळे नागरिक त्रस्त नाशिक : प्रतिनिधी वाढलेल्या तापमानाबरोबर शहरातील विविध…