महाराष्ट्र

सीपीएल क्रिकेट स्‍पर्धेचे दिमाखात उद्‌घाटन

नाशिक पेन किलर, न्‍यूरो प्‍लस,  रोबोडॉक्‍स संघांची आघाडी
नाशिक ः प्रतिनिधी
इंडियन मेडिकल असोसिएशनचे सदस्‍य असलेले कन्‍सल्‍टंट आणि सुपरकन्‍सल्‍टंट डॉक्‍टरांची कन्‍सल्‍टंट प्रिमियर लिग (सीपीएल) २०२३ स्‍पर्धा आयोजित केली आहे. या स्‍पर्धेचे शुक्रवारी (दि.३) दिमाखात उद्‌घाटन झाले. पहिल्‍या दिवशी  या संघांनी आपआपले सामने जिंकले.
या क्रिकेट स्‍पर्धेचे उद्‌घाटन नाशिक जिल्‍हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विनोद शहा, सचिव समीर रकटे, सीपीएल २०१३ चे समिती प्रमुख डॉ. अनिरुद्ध भांडारकर, आयोजन समिती अध्यक्ष डॉ. नितीन चिताळकर, सचिव डॉ. मिलिंद गांगुर्डे यांच्‍यासह मान्‍यवर उपस्‍थित होते.
उद्‌घाटनानंतर झालेल्‍या पहिल्‍या सामन्‍यात नाशिक पेन केअर संघाने संकल्‍प सुपरनोवा संघाचा पराभव केला. विजयासाठी लागणार्या ६२ धावा नाशिक पेन केअर संघाने अवघ्या ५.४ षटकांमध्ये पूर्ण करत सामना जिंकला. सामनावीर आणि सर्वाधिक षटकारचा किताब डॉ.गणेश सांगळे, बेस्‍ट कॅचसाठी डॉ.विशाल करवंदे यांना गौरविले. दुसर्या सामन्‍यात न्‍युरोप्‍लस वीर मराठा संघाने ७ बाद ८७ धावा करतांना प्रतिस्‍पर्धी सह्याद्री शेराज्‌ संघाला ७२ धावांवर गुंढाळत सामना जिंकला. डॉ.कुणाल देसाई सामनावीर, डॉ.रविंद्र गायकवाड बेस्‍ट कॅच, तर मॅक्‍स सिक्‍सचा किताब संतोष बोरसे यांना दिला.
तिसर्या सामन्‍यात ओम वॉरीयरने दिलेले ७४ धावांचे लक्ष्य ९.४ षटकांत गाठतांना ऑरथो रोबोडॉक्‍स संघाने सामना जिंकला. डॉ.सचिन आहेर सामनावीर ठरले, बेस्‍ट कॅच डॉ.प्रदीप राउत आणि मॅक्‍स सिक्‍सचा किताब डॉ.सचिन आहेर यांना दिला. चौथ्या सामन्‍यात न्‍युरोप्‍लस वीर मराठा संघाने दिलेले ९४ धावांचे लक्ष संकल्‍प सुपरनोव्‍हा संघाला गाठता आले नाही. त्‍यामूळे हा सामना न्‍युरोप्‍लस वीर मराठा संघाने जिंकला. डॉ.कुणाल देसाई सामनावीर, मॅक्‍स सिक्‍सचा किताब डॉ.सुहास कोटक, बेस्‍ट कॅचचा किताब डॉ.देवेंद्र कुलकर्णी यांनी पटकावला.
पाचवा सामन्‍यात ओम वॉरीयर संघाने ९८ धावा केल्‍या. प्रतिस्‍पर्धी सह्याद्री शेराज्‌ संघाला ७ बाद ८४ धावा करता आल्‍याने ओम वॉरीयरने सामना जिंकला. सामनावीर डॉ. प्रदीप राउत, मॅक्‍स सिक्‍स डॉ.सुदर्शन पाटील, तर बेस्‍ट कॅच डॉ.प्रशांत मुठाळ यांना देण्यात आला. सहावा सामना अत्‍यंत उत्‍कंठावर्धक राहिला.
शेवटच्‍या चेंडूपर्यंत चाललेल्‍या या सामन्‍यात ऑरथो रोबोडॉक्‍सच्‍या डॉ.सुशील अंतुर्लीकर यांनी शेवटच्‍या दोन चेंडूत १३ धावा करतांना सामन्यात विजय मिळविला. संघाला नाशिक पेन केअर संघाने १०३ धावांचे लक्ष दिले होते. शेवटच्‍या षटकात नो बॉलने रोबोडॉक्‍स संघाला तारले. या सामन्‍यात सामनावीर व मॅक्‍स सिक्‍सचा किताब डॉ.अंतुर्लीकर यांना तर बेस्‍ट कॅचचा किताब प्रणित सोनवणे यांना दिला.
Devyani Sonar

देवयानी सोनार या 2018 पासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. दैनिक पुढारी मधून त्यांनी पत्रकारिता सुरू केली, सध्या त्या दैनिक गांवकरी मध्ये उपसंपादक तसेच ऑनलाइन कंटेंट क्रीएटर म्हणून कार्यरत आहेत. आरोग्य, शैक्षणिक तसेच जिल्हा परिषद , सामाजिक विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेले आहे. बीकॉम तसेच एम ए अर्थ शास्त्र यात पदयुत्तर पदवी मिळवली आहे. पत्रकारितेत अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

4 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

5 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

5 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

5 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

5 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

5 hours ago