उद्योजकांना वरदान ठरणाऱ्या निमा बँक
समिटची तयारी पूर्ण
नाशिक- बॅंकांशी निगडित उद्योजकांच्या विविध प्रश्नांची सोडवणूक त्वरेने व्हावी हा उदात्त दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून उद्योजक आणि बँका यांना एकाच छताखाली आणणाऱ्या दोन दिवसांच्या निमा बँक समिटचे उद्घाटन आज सोमवार दि. 27 फेब्रुवारीला रिझर्व्ह बँकेचे संचारलक सतीश मराठे यांच्या हस्ते तसेच बँक ऑफ महाराष्ट्रचे कार्यकारी संचालक आशिष पांडे आणि विविध बँका तसेच वित्तीय संस्थांचे वरिष्ठ अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत निमा हाऊस,सातपूर येथे संपन्न होत आहे,अशी माहिती निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी दिली
बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया, एस के डी कन्सल्टंट, यांचा प्रमुख सहभाग समिट मध्ये असून त्यांनी याचे प्रायजोकत्व स्वीकारले आहे. सह आयुक्त उद्योग विभाग, महाराष्ट्र शासन यांचेही विशेष सहकार्य लाभत आहे ,सिडबी,स्टेट बँक,आयसीआयसीआय, विश्वास बँक,एचडिफसी बँक, कोटक महिंद्रा बँक,नामको ,जनलक्ष्मी,सारस्वत,पंजाब नॅशनल, महाराष्ट्र ग्रामीण, लोकमान्य राबीएल, अर्थालय,
अर्थयान या उद्योगांना आर्थिक बाबीत मार्गदर्शन करणाऱ्या कंपन्यांसहित अन्य बँकानीही यात भाग घेतला आहे. आणखी इतर बँकाही यात उत्स्फूर्त सहभाग नोंदविणार आहेत.समिटमध्ये विविध आठ वेबीनार होतील.
या समिटमध्ये बँकांचे अधिकारी उद्योजकांसाठी असलेली कर्ज प्रक्रिया तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांची माहिती बँकांचे वरिष्ठ अधिकारी अत्यंत सोप्या आणि सुलभ पद्धतीने समजावून सांगणार आहेत.उद्योजक आणि बँका यांच्यातील परस्पर संबंध त्यामुळे अधिक मजबूत होतील आणि एकमेकांबद्दल असलेले समज-गैरसमज दूर होतील,असा विश्वासही बेळे यांनी व्यक्त केला.नाशिकच्या उद्योगवाढीसाठी विविध राष्ट्रीयीकृत,खासगी,शेड्युल्ड,सहकारी बँका तसेच पतसंस्थांची भूमिका मोलाची राहिल्याने त्यांचे अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांचा यथोचित सन्मानही या समीटच्या निमित्ताने होणार आहे,असेही बेळे पुढे म्हणाले.
2009 आणि 2013 मध्ये बँक समिटचे यशस्वी आयोजन केले होते.त्यास मिळालेला प्रतिसाद व उद्योजकांना होणार फायदा लक्षात घेऊन यंदाही निमा बँक समिट 2023 चे आयोजन करण्यात आले आहे .
समिटच्या यशस्वीतेसाठी समितचर अध्यक्ष गोविंद झा,समनव्ययक डी.जी. जोशी,निमाचे उपाध्यक्ष किशोर राठी,आशिष नहार,मानद सचिव राजेंद्र अहिरे,शशांक मणेरीकर,सुमित बजाज खजिनदार विरल ठक्कर, जयंत जोगळेकर, रवींद्र झोपे ,राजेंद्र वडनेरे, मिलिंद राजपूत , वैभव जोशी, संजय सोनवणे, श्रीधर व्यवहारे , जितेंद्र आहेर, मनीष रावळ,श्रीकांत पाटील, एस.के.नायर, सुधीर बडगुजर , सुरेंद्र मिश्रा,सतीश कोठारी आदी प्रयत्नशील आहेत.