भारताची अर्थव्यवस्था सातत्याने मजबुतीकडे-सतीश मराठे
नाशिक: प्रतिनिधी
कोरोनामुळे आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाल्या व अनेक अडचणी आल्या होत्या.मात्र आज आपली अर्थव्यवस्था अधिक मजबूत झाली आहे. 21 मापदंडांवर ती खरी उतरली असून सद्या जगात ती पाचव्या क्रमांकावर असली तरी येत्या काही वर्षांत आपण तिसऱ्या क्रमांकावर झेप घेऊ,असा विश्वास रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे यांनी व्यक्त केला.
उद्योजक आणि बँकांमध्ये समनव्य साधून त्यांच्यात परस्पर सामंजस्य व जिव्हाळ्याचे नाते निर्माण करावे तसेच उद्योजकांसाठी लाभदायी असलेल्या बँकांच्या विविध योजना आणि कर्ज वितरण व्यवस्था उद्योजकांना सोप्या आणि सुलभ रीतीने समजावून सांगण्याच्या उद्देशाने निमा सभागृहात आयोजित निमा बँक समिट 2023 चे उद्घाटन सतीश मराठे यांच्या हस्ते झाले तेव्हा ते मार्गदशन करतांना बोलत होते.
अध्यक्षस्थानी निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे तर व्यासपीठावर बँक ऑफ महाराष्ट्रचे कार्यकारी संचालक आशिष पांडे,बँक ऑफ बडोदाचे उपमहाव्यवस्थापक सुभाषित मिश्रा, सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रीय प्रमुख रणजीत सिंग,निमा समितीचे अध्यक्ष गोविंद झा,समन्वयक डी जी.जोशी,उपाध्यक्ष आशिष नहार,किशोर राठी, सचिव राजेंद्र अहिरे आदी होते.
गेल्या 7 ते 8 वर्षांत देशांत नोटाबंदी,जीएसटी,रेरा सारखे महत्वपूर्ण झाले.त्याचे दृश्य परिणाम कालांतराने दिसू लागले आहेत.नवीन तंत्रज्ञानात भारत आघाडीवर आहे.कृषीशी निगडित उद्योगात आज भारताने मोठी झेप घेतली आहे.उच्च शिक्षित युवा वर्ग या क्षेत्रात मोठ्याप्रमाणात येत असून या क्षेत्रातील निर्यातीच्या बाबतीत आपण येत्या काही वर्षांत आघाडीवर राहू.ग्रामीण भागाच्या विकासासाठी महत्वपूर्ण पावले उचलली जात आहे.भारताचा मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातील विकास दर जो 15 टक्क्यांच्या आसपास घुटमळत होता तो आज 17.5 टक्के इतका झाला आहे.पुढील काळात हा विकास दार 20 ते 22 टक्क्यांपर्यंत जाईल.या क्षेत्रात चायना प्लस वन असे म्हटले जाते.मात्र आता भारत प्लस वनचीही चर्चा सुरू झाली आहे.35 देशांनी व्यवहारासाठी रुपयाचा स्वीकार केला ही बाबही वाखाणण्याजोगी आहे. डिजिटल व्यवहाराच्या बाबतीतही भारताने मोठी प्रगती साधली आहे,असेही मराठे यांनी गौरवाने नमूद केले.
उद्योजक आणि ग्राहकांनी बँकांना मित्र समजावे. लोकांचा बँकांवरचा विश्वास दिवसेंदिवस वाढत आहे ही बाब स्तुत्यच म्हणावी लागेल.आधी आपल्याकडे थेट परकीय गुंतवणूक म्हणावी तशी येत नव्हती मात्र आता 61 क्षेत्रात ही गुंतवणूक आली आहे.देशाच्या विकासात महिला बचत गटाचे योगदान मोलाचे असल्याचे बँक ऑफ महाराष्ट्रचे आशिष पांडे यांनी नमूद केले.समिटचे अध्यक्ष गोविंद झा आणि समनव्ययक डी.जी.जोशी यांनी प्रास्ताविकात समिट घेण्यामागचा उद्देश स्पष्ट केला. बँकांच्या विविध लाभदायी योजना व कार्यपद्धतीची माहिती उद्योजकांना उपलब्ध करून देण्यासाठी हे समिट आहे.याआधी निमाने 2009 आणि 2013 मध्ये बँक समिटचे यशस्वी आयोजन केले होते.त्यास मिळालेला प्रतिसाद व उद्योजकांना होणार फायदा लक्षात घेऊन यंदाही निमा बँक समिट 2023 चे आयोजन करण्यात आले आहे,असे धनंजय बेळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात नमूद केले. पुढील काळात उद्योगांच्या विस्तारासाठी नाशिक हेच डेस्टिनेशन हेच आमचे खरे ध्येय असून त्यादृष्टीने आमची वाटचाल सुरू झाली आहे,असेही बेळे पुढे म्हणाले.सूत्रसंचालन शशांक मणेरीकर यांनी केले.
समीटच्या यशस्वीतेसाठी खजिनदार विरल ठक्कर, जयंत जोगळेकर, रवींद्र झोपे ,राजेंद्र वडनेरे, मिलिंद राजपूत , वैभव जोशी, संजय सोनवणे, श्रीधर व्यवहारे , जितेंद्र आहेर, मनीष रावळ,श्रीकांत पाटील, एस.के.नायर, सुधीर बडगुजर , सुरेंद्र मिश्रा,सतीश कोठारी आदी प्रयत्नशील आहेत.उद्घाटन सोहळ्यास भाहपाचे प्रदेश प्रवक्ते प्रदीप पेशकार, आयमाचे अध्यक्ष निखील पांचाळ, सरचिटणीस ललित बूब,कोषाध्यक्ष राजेंद्र कोठावदे,सचिव योगिता आहेर,सावाना पदाधिकारी प्रेरणा बेळे,समीर कांबळे आदींसह निमाचे आजी माजी पदाधिकारी तसेच उद्योजक आणि बँकांचे अधिकारी, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.
सिडको: विशेष प्रतिनिधी घरातील आपआपसांतील वाद पराकोटीला गेल्याने नवऱ्याने रागाच्या भरात मंगळवारी (दि.४) राहत्या घरात…
*हिप हॉप रॅपवर थिरकत फुल टु एन्जॉय करत इलेक्ट्रिफाईंग वातावरणात दोन दिवसीय सुला फेस्टचा समारोप*…
सापुतारा जवळ बस दरीत कोसळून पाच प्रवाशी ठार ४५ प्रवासी जखमी. सुरगाणा : प्रतिनिधी वणी…
दारूच्या नशेत पतीने पत्नीला पेटवले महिला गंभीर जखमी; सातपूरची घटना सातपूर : प्रतिनिधी सातपूर नाशिक…
स्वयंपाक करत असताना गॅस शेगडीवरील काच फुटली, गृहिणी बालंबाल बचावली सिडको : विशेष प्रतिनिधी चुंचाळे…
नांदगाव चाळीसगाव रस्त्यावर कार दुचाकी अपघातात पती-पत्नी ठार ; दोन जण गंभीर जखमी मनमाड :आमिन…