गोदावरी उगमस्थान “नमामि गोदा प्रकल्प” मध्ये समाविष्ट करा

 

 

 

 

 

 

 

 

केंदिय जलशक्ती मंत्रालयाकडे विश्वस्तांची मागणी

 

ञ्यंबकेश्वर:

 

ञ्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त आणि ञ्यंबक नगर परिषदेचे माजी नगरसेवक यांच्या शिष्टमंडळाने केंद शासनाचे जलशक्ती मंत्री ना.गजेंद्र सिंह शेखावत यांची राजधानी नवी दिल्ली येथे भेट घेतली.या भेटीत त्यांच्याशी सवीस्तर चर्चा करण्यात आली.ञ्यंबकेश्वर येथे गोदावरीचे उगमस्थान आहे.बारा ज्यातिर्लींगापैकी महत्वाचे असे आद्य जोतिर्लींग त्र्यंबकेश्वर भगवान प्राचीन मंदिर आहे.येथे कुशावर्त तीर्थ असून कुंभमेळा शाही स्नान होते.पौराणिक आख्यायिका मध्ये समुद्रमंथनातून निघालेल्या अमृताचे थेंब कुशावर्तात पडले आहेत.ब्रह्मगिरी पर्वतावर गौतम ऋषींच्या तपश्चर्येने गोदावरी अवतरण झाली.भारत सरकारने नमामि गोदा प्रकल्प हाती घेतला आहे.त्याची अंमलबजावणी ञ्यंबकेश्वरच्या उगमस्थान पासून करण्यात यावी.त्याचा लाभ देशभरातून येणा-या  भाविकांना होणार आहे.त्यासाठी हे शिष्टमंडळ आले असल्याचे स्पष्ट करण्यात आले.माननयीय मंत्री महोदयांना “नमामि गोदा प्रकल्प” अंतर्गत गोदावरी नदीची स्वच्छता आणि सुशोभीकरण करण्यासाठी व ञ्यंबकेश्वचा त्यात समावेश करण्याचा आग्रह करण्यात आला.गोदावरी नदीच्या उगमस्थानाचे संरक्षण व स्वच्छता करणे अत्यंत महत्त्वाचे व आवश्यक असल्याचे मंत्रीमहोदयांच्या निदर्शनास आणून दिले.याबाबतचे सवीस्तर पत्र त्यांना सादर करण्यात आले.यावेळी भगवान त्र्यंबकेश्वर मुकुट प्रतिमा भेट देण्यात आली. दरम्यान याबाबत जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह यांनी पुढच्या आठ पंधरा दिवसात स्वत: ञ्यंबकेश्वर येथे येत असल्याचे आणि समक्ष पाहणी करणार असल्याचे शिष्ट मंडळास स्पष्ट केले.या शिष्टमंडळात विश्वस्त भूषण अडसरे,माजी नगरसेवक शामराव गंगापूत्र,स्वप्नील शेलार आणि दिपक लोखंडे सहभागी झाले होते.याबाबत ञ्यंबकेश्वर नगर परिषद मुख्याधिकारी व प्रशासक संजय जाधव,अभियंता अभिजीत इनामदार यांच्याशी चर्चा करून सवीस्तर प्रकल्प अहवाल तयार करणार असल्याचे त्यांनी सांगीतले आहे

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *