शिवसेनेत इनकमिंग सुरूच : मनसे, ठाकरे गटाला धक्का

शिवसेनेत इनकमिंग सुरूच : मनसे, ठाकरे गटाला धक्का

मजी नगरसेवक शेवरे, पवार यांच्या हाती धनुष्यबान

नाशिक : प्रतिनिधी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सातपूर प्रभाग समितीचे माजी सभापती योगेश शेवरे, ठाकरे गटाचे नाशिकरोड जेलरोड परिसरातील माजी नगरसेवक पवन पवार आणि काँग्रेस महिला आघाडीच्या नाशिक जिल्ह्याध्यक्षा वंदनाताई पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थित शिवसेनेत प्रवेश केला

शिवसेनेचे मुख्यनेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री . ना. एकनाथ शिंदे आणि युवानेते खा. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक मधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सातपूर प्रभाग समितीचे माजी .सभापती तथा माजी नगरसेवक योगेश शेवरे, उ.बा.ठा गटातील तथा नाशिकरोड जेलरोड परिसरातील माजी सभापती  माजी नगरसेवक पवन पवार व कांग्रेस महिला आघाडीच्या नाशिक जिल्ह्याध्यक्षा वंदनाताई पाटील यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला.  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी, सहसंपर्क प्रमुख राजू (अण्णा) लवटे, महानगर प्रमुख प्रविण (बंटी) तिदमे, विक्रम नागरे, अभय महादास, अक्षय पाटील आणि शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *