शिवसेनेत इनकमिंग सुरूच : मनसे, ठाकरे गटाला धक्का
मजी नगरसेवक शेवरे, पवार यांच्या हाती धनुष्यबान
नाशिक : प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सातपूर प्रभाग समितीचे माजी सभापती योगेश शेवरे, ठाकरे गटाचे नाशिकरोड जेलरोड परिसरातील माजी नगरसेवक पवन पवार आणि काँग्रेस महिला आघाडीच्या नाशिक जिल्ह्याध्यक्षा वंदनाताई पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थित शिवसेनेत प्रवेश केला
शिवसेनेचे मुख्यनेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री . ना. एकनाथ शिंदे आणि युवानेते खा. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक मधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सातपूर प्रभाग समितीचे माजी .सभापती तथा माजी नगरसेवक योगेश शेवरे, उ.बा.ठा गटातील तथा नाशिकरोड जेलरोड परिसरातील माजी सभापती माजी नगरसेवक पवन पवार व कांग्रेस महिला आघाडीच्या नाशिक जिल्ह्याध्यक्षा वंदनाताई पाटील यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी, सहसंपर्क प्रमुख राजू (अण्णा) लवटे, महानगर प्रमुख प्रविण (बंटी) तिदमे, विक्रम नागरे, अभय महादास, अक्षय पाटील आणि शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…