रुग्णवाहिका सुविधांचा अभाव चिंताजनक
नाशिक : प्रतिनिधी
शहरातील खड्डेमय रस्त्यांमुळे अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, नागरिकांना जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागत आहेत. काहीवेळा या अपघातांत जीव गमवावा लागल्याच्या घटनाही समोर येत आहेत. गणेशोत्सवाच्या उत्साहात सिडको परिसरातील गणेश चौक – अंबड पोलीस स्टेशन रोडवर एका मजुराचा अपघात झाला. एका अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेमुळे मजूर रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्धावस्थेत पडला. अपघातानंतर परिसरात मोठी गर्दी जमली होती.
यावेळी स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रसंगावधान दाखवत 108 रुग्णवाहिकेची वाट न पाहता जवळच्या स्वामी समर्थ मोरवाडी दवाखान्यात धाव घेतली. सुरुवातीला रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यास दवाखान्याकडून नकार मिळाला; मात्र परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता अखेर रुग्णवाहिका देण्यात आली. वेळेत उपचार मिळाल्याने अपघातग्रस्त व्यक्तीचा जीव थोडक्यात वाचला. सध्या त्याच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेतून सिडको सारख्या मोठ्या व दाट लोकवस्तीच्या भागात वैद्यकीय सुविधा अपुर्या असल्याचे स्पष्ट झाले आहे. स्वतंत्र रुग्णवाहिका व शववाहिका सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत असून, भविष्यात मोठा अनर्थ टाळण्यासाठी अशा सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.
अपघाताची माहिती मिळताच 108 ला फोन केला होता. मात्र जखमीची अवस्था पाहून हाकेच्या अंतरावर असलेल्या मोरवाडी दवाखान्यात जाऊन रुग्णवाहिकेची मागणी केली. सुरुवातीला नकार मिळाला, पण परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली. यामुळे अपघातग्रस्ताचा जीव वाचवता आला. मात्र, भविष्यात अशा परिस्थितीत नागरिकांना उपचार मिळण्यात अडचण येऊ नये यासाठी सिडको भागाकरिता स्वतंत्र रुग्णवाहिका व शववाहिका सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी आम्ही महापालिकेकडे सातत्याने विनंती करत आहोत.
– योगेश कातकाडे, सामाजिक कार्यकर्ते
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…