भारताची विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये धडक

 

मुंबई:

 

वानखेडेच्या मैदानावर श्रीलंकेचा पराभव करत भारताने विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. भारताचा हा सलग सातवा विजय आहे. यंदाच्या विश्वचषकात सेमीफायनलमध्ये पोहचणारा भारत पहिला संघ आहे.

भारताने 50 षटकात 8 गडी गमवून 357 धावा केल्या. श्रीलंकेसमोर विजयासाठी 358 धावांचं आव्हान दिल. मात्र श्रीलंकेचा संपूर्ण संघ 55 धावांवर सर्वबाद झाला. या सामन्यात मोहम्मद शमीन 18 धावा देत 5 गडी बाद केले.  तर मोहम्मद सिराजने 3 विकेट घेतले. तर जडेजा आणि जसप्रीत बुमराह याने प्रत्येकी एक गडी बाद केला. भारताकडून शुबमन गिलने 92 धावा, विराट कोहलीने 88, तर श्रेयस अय्यरने 82 धावा केल्या.

विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी धावांचा पाऊस पाडला तर गोलंदाजी सिराज, बुमराह आणि शामी यांनी कमाल केली. त्याशिवाय अय्यर, राहुल, कुलदीप आणि जाडेजा यांचेही मोलाचे योगदान आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *