भारत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनेल : राष्ट्रपती

नवी दिल्ली :

भारत हा जगातील तिसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनेल. स्वातंत्र्यलढ्याच्या बळावर आपल्या देशाचे भाग्य बदलले. भारत स्वतंत्र झाला आणि आपण आपल्या स्वत:च्या राष्ट्रीय धोरणांचे शिल्पकार झालो, असे गौरवोद्गार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काढले. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्राला संबोधित केले. राष्ट्रपती मुर्मू यांनी राष्ट्राला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या की, प्रजासत्ताक दिनाच्या पवित्र पर्वावर आपल्या देशाच्या भूतकाळ, वर्तमान आणि भविष्याची स्थिती आणि दिशांवर चिंतन करण्याची ही संधी आहे. 26 जानेवारी 1950 पासून आपण आपल्या प्रजासत्ताकाला संवैधानिक आदर्शांकडे घेऊन जात आहोत. त्या दिवशी आपण आपल्या संविधानाची पूर्णपणे अंमलबजावणी केली. त्या म्हणाल्या की, लोकशाहीची मातृभूमी असलेला भारत वसाहतवादी राजवटीपासून मुक्त झाला आणि आपले लोकशाही प्रजासत्ताक अस्तित्वात आले. आपले संविधान हे जागतिक इतिहासातील सर्वात मोठ्या प्रजासत्ताकाचा पाया आहे.

India will become the world’s third largest economy: President

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *