अहमदाबाद :
येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर टीम इंडियाने टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा 96 धावांनी पराभव करत इतिहास रचला. या विजयासह भारत सलग दुसर्यांदा टी-20 विश्वचषक जिंकणारा आणि किताब डिफेंड करणारा पहिला संघ ठरला. इतकंच नाही तर यजमान देशाने प्रथमच टी-20 वर्ल्डकप जिंकण्याचा पराक्रम टीम इंडियाने करून दाखवला. विजेतेपदाची ट्रॉफी हातात येताच कर्णधार सूर्यकुमार यादवसह संपूर्ण संघाने मैदानावर जल्लोेष केला.
अंतिम सामन्यात भारताने आधी फलंदाजी करत 20 षटकांत पाच बाद 255 धावांचा डोंगर उभा केला. या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडची संपूर्ण टीम 19 षटकांत 159 धावांत गारद झाली. टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये धावांच्या फरकाने मिळालेला हा सर्वात मोठा विजय ठरला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला उतरलेल्या टीम इंडियाला अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन यांनी दमदार सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 98 धावांची तुफानी भागीदारी केली. अभिषेक शर्माने 21 चेंडूत 6 चौकार आणि 3 षटकारांसह 52 धावा करत अर्धशतक झळकावले. संजू सॅमसन शतकाच्या उंबरठ्यावर येऊन थांबले, त्याने 46 चेंडूत 5 चौकार आणि 8 षटकारांच्या मदतीने 89 धावा केल्या.
न्यूझीलंडकडून टिम सीफर्टने सर्वाधिक 52 धावा केल्या. त्याने 26 चेंडूत 2 चौकार आणि 5 षटकार मारले. मात्र, संघातील सात फलंदाज एक अंकी धावसंख्येत बाद झाले. केवळ 72 धावांवर न्यूझीलंडचे पाच फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले
होते.
जसप्रीत बुमराहने न्यूझीलंडला गुंडाळले
256 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या फलंदाजांवर सुरुवातीपासूनच दबाव दिसून आला. टिम सीफर्ट आणि फिन अॅलन यांनी पहिल्या विकेटसाठी 31 धावांची भागीदारी केली, पण त्यानंतर किवी संघाची घसरण सुरू झाली.
India wins T20 World Cup for the third time, defeats New Zealand