नाशिक : प्रतिनिधी
स्वच्छता सर्वेक्षण अंतर्गत केंद्राचे पथक तीन दिवसांपूर्वी शहरात दाखल झाले आहे. या पथकाने आतापर्यंत शहरातील वीस प्रभागांना भेटी देऊन तेथील पाहणी करत त्याची माहिती नोंदवून घेतली आहे. उर्वरित पंधरा प्रभागांची पाहणी आज-उद्या होण्याची शक्यता आहे. दरम्यान, हे पथक शहराच्या बाहेर असलेल्या खत प्रकल्पाला भेट देऊन तेथील इत्यंभूत माहिती जाणून घेणार असल्याचे समजते आहे. नाशिक शहराचा स्वच्छतेत चांगला क्रमांक यावा याकरिता पालिका प्रशासनाकडून गेल्या काही दिवसांपासून शहर स्वच्छ ठेवण्यासाठी हरतर्हेने प्रयत्न करण्यात येत आहे. नागरिकांनी स्वच्छ मोहिमेत त्यांचे अभिप्राय नोंदवण्यासाठी पालिका आयुक्त रमेश पवार यांनी आवाहन केले होते.
शहरात ओल्या व सुक्या कचर्याच्या वर्गीकरणाची नागरिकांकडून होणारी अंमलबजावणी, व्यावसायिक क्षेत्रात ओल्या व सुक्या कचर्यासाठी स्वतंत्र डस्टबीन ठेवण्याच्या सूचनांची अंमलबजावणी आणि घंटागाडीमार्फत होणारी प्रत्यक्ष अंमलबजावणी याची या पथकामार्फत प्रत्यक्ष भेटीद्वारे माहिती घेतली जाणार आहे. कचरा वर्गीकरणाबाबत नागरिकांचा फीडबॅकही या पथकामार्फत जाणून घेतला जाणार आहे. उद्यानांमध्ये नियमित स्वच्छता होते काय, उद्यानांमध्ये कचर्यासाठी स्वतंत्र कचरा डब्यांची व्यवस्था केली आहे काय, याची देखील तपासणी या पथकामार्फत केली जाणार आहे. केंद्र शासनातर्फे स्वच्छ भारत अभियानांतर्गत दरवर्षी देशपातळीवरील स्वच्छ शहर स्पर्धेचे आयोजन केले जाते. या स्पर्धेअंतर्गत केंद्रीय पथकांमार्फत तीन टप्प्यांत सर्वेक्षण केले जाते. दोन महिन्यांपूर्वी केंद्रीय पथकाने नाशकात येत पहिल्या टप्प्याची तपासणी पूर्ण करत नागरिकांचा फीडबॅक जाणून घेतल्यानंतर आता मझिरो गार्बेज सिटीफ अर्थात कचरामुक्त शहर गटाच्या सर्वेक्षणासाठी केंद्राचे पथक नाशकात दाखल झाले असून, पथकातील सदस्यांकडून शहरातील विविध ठिकाणची पाहणी करण्यात येत आहे. स्वच्छ शहर स्पर्धेत नाशिकचा समावेश पहिल्या पाच शहरांमध्ये व्हावा, यासाठी आयुक्त रमेश पवार यांच्याकडून प्रयत्न होत असून, त्याअनुषंगाने शहर स्वच्छ कसे राहील, सुंदर कसे दिसेल अशा विविध सूचना संबंधित विभागाना दिल्या आहेत. या स्पर्धेच्या पहिल्या टप्प्याकरिता नागरिकांच्या फीडबॅकवर भर दिल्यानंतर आता कचरामुक्त शहराच्या सर्वेक्षणाकरिता येणार्या पथकाच्या पार्श्वभूमीवर आयुक्त पवार यांनी घनकचरा व्यवस्थापन, उद्यान, बांधकाम, नगररचना, यांत्रिकी विभागाच्या अधिकार्यांना स्वच्छतेवर भर देण्याचा आणि सतर्क राहण्याचा इशारा दिला होता. याशिवाय चौकांचे सुशोभीकरण, भित्तिचित्रे, फूटपाथ व दुभाजकांमधील स्वच्छता, हरितीकरण याचीही माहिती या पथकामार्फत घेतली जाणार आहे. त्यानंतर हे पथक आपला अहवाल सादर करणार आहे.
गाडीत पैसे असल्याच्या संशयावरून राडा साकोरा येथे गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठी चार्ज नांदगांव /…
नाशिक : प्रतिनिधी नाशिक मध्यचे दोन्ही उमेदवार देवयानी फरांदे आणि वसंत गीते एकाच वेळी आल्याने…
नांदगाव: येथील मतदार संघात आज समीर भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यात आज पुन्हा राडा झाला.…
नाशिक: लोकशाहीचा उत्सव असलेल्या मतदानास सकाळी 7 वाजेपासून सुरुवात झाली आहे, मतदानाचा हक्क बजावत अनेकांनी…
जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ६. ८९ टक्के मतदान नाशिक मध्य मध्ये दोन तासात सर्वाधिक…
निफाड:- प्रतिनिधी निफाड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उ बा ठा चे उमेदवार माजी आमदार अनिल कदम…