आरोपींवर कठोर कारवाई करण्याच्या पोलिसांना सूचना
नाशिक : प्रतिनिधी
गुंडांच्या टोळक्याकडून तोडफोड करण्यात आलेल्या वाहनांची काल आमदार सीमाताई हिरे यांच्याकडून पाहणी करण्यात आली. परिसरात वारंवार होणार्या तोडफोडीच्या घटनांमुळे श्रमिकनगर येथील संतापलेल्या रहिवाशांना धीर देत यापुढे गुंडांकडून दहशतीच्या घटना घडूच नये यासाठी आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्याच्या सूचना आ. हिरेंकडून पोलिस प्रशासनाला करण्यात आल्या. वाहनांच्या झालेल्या तोडफोडीची शासनाकडून भरपाई मिळावी, अशी आग्रही मागणी नुकसानग्रस्तांनी आमदार हिरे यांच्याकडे केली आहे.
शुक्रवारी मध्यरात्री एका टोळक्याने लाकडी दांडे तसेच दगड आणि विटांचा मारा करत श्रमिकनगर भागातील कडेपठार परिसरातील मोकळ्या मैदानावरील कार, स्कूल बस, टेम्पोची तोडफोड केल्याची घटना घडल्याने रहिवासी संतप्त झाले. या घटनेची गंभीर दखल घेत आमदार हिरे यांनी घटनास्थळावर जाऊन नुकसानग्रस्त वाहनांची पाहणी करत रहिवाशांना धीर दिला.
पुन्हा तोडफोडीच्या घटना होऊ नयेत यासाठी पोलिसांनी परिसरात रात्रीची ग्रस्त वाढवावी, दहशत माजवणार्या आरोपींना कधी नव्हे असा धडा शिकविण्याच्या सूचना आमदार हिरेंनी पोलिस प्रशासनाला केल्या आहेत.
यावेळी मंडळ अध्यक्ष नारायण जाधव, माजी अध्यक्ष भगवान काकड, माजी नगरसेविका हेमलता कांडेकर, प्रेम पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिनकर कांडेकर, हेमंत नागरे, सागर वैष्णव, कल्पेश खांडेकर, सुनील मेत्रे, सविता गायकर, सागर जारे, शरद काळे, मंगला कोठारे, अविनाश गायकर आदी उपस्थित होते.
मुलींचा सांभाळ करण्याचा कंटाळा आल्याने आईने उचलले भयानक पाऊल शहापूर : साजिद शेख शहापूर…
मंत्री गिरीश महाजन यांचा एकनाथ खडसे यांना सवाल नाशिक : प्रतिनिधी पुण्यात रेव्ह पार्टीवर पोलिसांनी…
दि. 27 जुलै ते 2 ऑगस्ट 2025 पुरुषोत्तम नाईक मेष : आप्तेष्टांच्या गाठीभेटी या सप्ताहात…
मंत्री गिरीश महाजन : सुनील बागूल, राजवाडे यांचा अखेर भाजपमध्ये प्रवेश नाशिक ः प्रतिनिधी भारतीय…
दक्षिण भारत, मध्य प्रदेशातील कांद्याच्या आवकेने भाव गडगडण्याची शक्यता लासलगाव : समीर पठाण गेल्या काही…
नाफेडने जाहीर केले नवे कांदा खरेदी दर लासलगाव :- समीर पठाण गेल्या महिन्यापासून नाफेडच्या माध्यमातून…