महाराष्ट्र

प्रेरणादायी स्वाती

जीवनाच्या वाटेवर अनेक व्यक्ती भेटत असतात. काही तात्पुरती सोबत असतात. काही कायमस्वरूपी साथ देतात आणि आपल्या जीवनात अनेकदा विविधरंगी सुखाची बरसात करत असतात. यातून मैत्रीबंध जुळले जातात. कॉलेजला असताना आमचे एक शिक्षक नेहमी म्हणायचे की, आपल्या क्षेत्राव्यतिरिक्त इतरही क्षेत्रांतील व्यक्तींशी आपली मैत्री असली पाहिजे. वेगळे अनुभव मिळतात.

सविता दिवटे-चव्हाण

तसा योग जुळून आला. मी शिक्षकी पेशात आणि मूळ अहमदनगर जिल्ह्यातील कृषी सहाय्यक पदावर असलेली स्वाती झावरे-जाधव नोकरीच्या निमित्ताने आमच्या शेजारी राहायला आली. आमच्यामध्ये वैचारिक देवाण-घेवाण होऊ लागली आणि सूर जुळत गेले मैत्रीचे.
तिच्याकडून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. स्त्री म्हणून आपल्यातील सुप्त शक्तीला वाव देत स्वावलंबी बनण्याचा तिचा स्वभाव.. टू व्हीलर तर कधीच शिकलेली पण नोकरी करताना येणार्‍या अडचणी लक्षात घेता फोर व्हीलर शिकण्याचा चंग बांधला आणि काही दिवसांतच उत्कृष्ट चारचाकी गाडी चालवू लागली. कॉलनीतल्या मैत्रिणींचा ‘फुल टू धमाल’ नावाचा व्हॉट्सअप ग्रुप बनवला. अतिशय उत्साही, हौशी, सदाबहार प्रत्येक कार्यक्रमात हिरिरीने सहभागी होणारी आणि प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक दृष्टीने बघणारी, समस्या तिथे उपाय शोधणारी, मैत्रिणींना चार भिंतीच्या बाहेर पडायला लावणारी, पर्यटनाची आणि नावीन्याची आवड असणारी ती आमची ऊर्जास्रोत आणि प्रेरणा बनली. नवरात्रोत्सव हळदीकुंकू, कोजागिरी पौर्णिमा, शिवजयंती, महिला दिन, मैत्रिणींचे वाढदिवस, सहलींचे आयोजन, महिला कृषी पर्यटन अशा विविध कार्यक्रमांत पुढाकार घेऊन सर्वांना सहभागी करून घेते. तिच्या नेतृत्वाखाली असे कार्यक्रम म्हणजे आनंदाची पर्वणी असते. कारण ती म्हणजे उत्साहाचा सळसळता झराच. हे सर्व करताना स्वतःला आर्थिक, मानसिक, शारीरिक झळ बसली तरी कधी त्याचा विचार करत नाही, कारण तिच्या मते आनंद आपणास पैशात विकत घेता येत नाही. त्यासाठी आपली जीवलग माणसे हवीतच. मैत्रिणींना कशाची गरज भासली तर ती सदैव तयार असते सहकार्याला. तिच्यासोबत कुठेही बाहेर गेलो तर बिनधास्त असतो आम्ही मैत्रिणी. कारण ती खूप धीट आणि दिलखुलास आहे. नेहमी सुखदुःखात पाठीशी असतेच ती.
कधी कधी अचानक काहीतरी ठरते तिच्या भरोशावर. पर्यटन, यात्रा, सिनेमा बघणे आणि इतरही काही प्रासंगिक. तिच्यासोबत चारचाकी गाडी मस्तपैकी भटकून येतो. कुणाची वाट पाहावी लागत नाही. स्वाती आहे तर काळजीच नाही. वेळेअभावी थोडे दिवस भेट झाली नाही तर मेसेज किंवा फोन येतो की ये आपल्या फ्रेंड्स कट्ट्यावर.. मग काय तिच्या सहवासात गप्पांची मैफल रंगते. वेगवेगळ्या विषयांवर विचारांची देवाणघेवाण होते…. कधी कधी एखाद्या चांगल्या कार्यक्रमाचा प्लॅनही शिजतो. आमच्या आणि आमच्या मुलांच्या यशाला भरभरून दाद देत कौतुक करणारी ती मुलांची लाडकी मावशी आहे.
मैत्रीच्या नात्याबरोबरच आपल्या कामाच्या ठिकाणीही उत्कृष्टतेचा ध्यास तिला असतो. नेतृत्वगुण तिच्या नसानसांत भिनलेला आहे. राज्यपातळीवर संघटनेचे महिला नेतृत्व ती करते आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या कृषी योजना आणि उपक्रम राबवत आहे. तिचे उपक्रम राज्य पातळीवर यशस्वी ठरलेले आहेत. कर्तव्यात कुठेच कसूर नाही. जास्तीत जास्त चांगला देण्याचा प्रत्येक ठिकाणी प्रयत्न असतो.तिच्यामुळे जीवनाकडे आनंदी आणि सकारात्मक बघण्याचा दृष्टिकोन मिळाला हे नक्की.

Devyani Sonar

Recent Posts

जिल्हा बँकेची ओटीएस योजना गदारोळात मंजूर

बँकेची विशेष सर्वसाधारण सभा विविध विषयांवरून गाजली नाशिक : प्रतिनिधी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची…

2 days ago

महिलांच्या तुलनेत केवळ 4 टक्के पुरुषांची नसबंदी

ग्रामीण भागात पुरुष अग्रेसर, शहरात मात्र अनास्था नाशिक ः प्रतिनिधी कुटुंबात एक किंवा दोन मुले…

2 days ago

महापालिका निवडणुकीत ‘वंचित’ कुणासोबत जाणार?

शिंदे सेनेसह ठाकरे गट, मनसेचा पर्याय; नव्या समीकरणाकडे लागले लक्ष नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या…

2 days ago

पदाचा गैरवापर; तत्कालीन प्रांताधिकारी निलंबित

मालेगावला संगमेश्वरमधील जमीन चुकीच्या पद्धतीने केली वर्ग एक मालेगाव : नीलेश शिंपी शहरातील संगमेश्वर येथील…

2 days ago

सर्व संतांच्या दिंड्या श्रीक्षेत्र पंढरपूरच्या वेशीवर

वाखारीत आज रिंगण सोहळा; वर्षानंतर संतांची गळाभेट, त्यानंतर नगर प्रवेश त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी आषाढवारीसाठी निघालेली…

2 days ago

ओझर विमानसेवेला भरघोस प्रतिसाद

मे महिन्यात 42 टक्क्यांची विक्रमी वाढ नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या ओझर विमानतळावरून प्रवास करणार्‍या प्रवाशांची…

2 days ago