उद्याने, वाहतूक बेट  तात्काळ सुशोभीकरण करा

 

 

 

 

जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांची आयुक्ताकडे मागणी

 

 

नाशिक : प्रतिनिधी

 

 

नाशिक शहरातील प्रमुख चौक, डिव्हाडर्स व मोक्यावर असलेली उद्याने यांची अक्षरश दुर्दशा झाली आहे. अनेक चौकांच्यातर कचरा कुंड्य झाली आहे. काही चौक प्रायोजकांच्या माध्यमातून विकसित केले असून त्यांची सुद्धा देखभालीविना अश्या चौकांमध्ये मातीचे ढीग निर्माण झाले आहे, जे शहराच्या वाहतुकीला अडथळे निर्माण करतातच परंतु  शहराच्या प्रमुख चौकातच अस्वच्छता निर्माण झाल्यामुळे जागोजागी डंपिग यार्ड तयार झाले. तरी याकडे लक्ष घालून लवकरात लवकर  काम करण्यात यावे. अशी मागणी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांनी पालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडे करण्यात आली आहे.

 

 

बोरस्ते यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे कीं,

 

नाशिकची ओळख हि अत्यंत महत्वाचे तीर्थक्षेत्र व कुंभमेळाचे शहर म्हणून जगप्रसिध्द आहे. याच बरोबर नाशिकने वाईन कॅपितल व ऑटोमोबाईल हब म्हणून आपली एक स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. या शहराला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, अनंत कान्हेरे, कवी कुसुमाग्रज, प्रा. वसंत  कानेटकर, चित्रमहर्षी दादासाहेब फाळके, कर्मवीर दादासाहेब गायकवाड, पं. विष्णू पळसकर, वामनदादा कर्डक या सारखी स्वातंत्रवीर, लोकशाहीर व जगप्रसिध्द कलावंतांचा वैभवशाली इतिहास आहे, म्हणूनच नाशिक मध्ये येणाऱ्या पर्यटकांचा, व्यापाऱ्यांचा आणि उद्योजकांचा ओघ हा कायमच राहीला आहे. कुठल्याही शहराची प्रतिमा ही त्या शहरातील इफ्रास्टचरवर असते, जसे शहरातील रोड, प्रमुख चौक, पूल, उद्याने इत्यादीवर असते मुळात या सर्व चौकांचे, डिव्हाडर्सचे, सुशोभीकरण करतांना ते थिमबेस असणे आवश्यक आहे, याबाबत निश्चित धोरण तयार करून त्याप्रमाणे नाशिक शहराची ओळख, शहराची वैशिष्ठे, शहरातील कलावंत, शहराची माहिती दर्शवणारी वाहतूक बेट सुशोभीकरण करणे आवश्यक आहे. त्यासाठी शहराचे झोन नुसार नियोजन करून त्यांचे थिमबेस सुशोभीकरण करावे, उदा. पंचवटी, तपोवन परिसरामध्ये धार्मिक थिम असणे आवश्यक आहे. अंबड, सातपूर सारख्या औद्योगिक परिसरात औद्योगिक व यांत्रिक थिम असणे आवश्यक आहे. याचबरोबर नाशिक शहरात थोर पुरुषांच्या नावाने जी मोठमोठी उद्याने आहेत त्यांची अवस्था देखील बिकट झाली आहे. उद्यानातील बेंचेस मोडून पडली आहे, लहान मुलांच्या खेळण्या तुटल्या, गंजल्या आहेत. झाल्दाची देखभाल वेळेवर होत नाही, उद्यानाच्या भिंतीना रंगरंगोटी झालेली नाही, उद्यानांचे प्रवेशद्वार मोडकळीस आले आहेत, ज्या मुळे रात्री तेथे टवाळखोरच दिसतात. ज्या ठेकेदारांना या उद्यानाची देखभालीची जबाबदारी दिली आहे त्यांना या बाबत सूचना देऊन प्रत्येक उद्यानासाठी सुरक्षारक्षकाची नेमणूक करून उद्यानांची साफसफाई व सुशोभीकरण लवकरात लवकर करण्यात यावी. नाशिक शहरात विविध प्रकारचे वाहतुकीचे पूल आहेत यांना देखील मुंबई व ठाणे शहरांच्या धर्तीवर विद्युत रोषणाई करून सुशोभीकरण करता येईल. तसेच नाशिक शहरांच्या मुख्य रस्त्यांवर अनेक मोठमोठ्या भिंती अत्यंत खराब परिस्थितीत आहेत. या भिंती दुरुस्त करून त्यांचे सुशोभीकरण कला महाविद्यालयातील विद्यार्थी व शहरातील कलावंतांकडून नाशिक शहराची वैशिष्ठे दर्शवणाऱ्या चित्रकलेच्या व रंगकामाच्या माध्यमातून करण्यात यावी. तसेच शहर सुशोभीकरण, सौंदर्यीकरण, उद्यानांच्या नुतनिकरन, विद्युत रोषणाईसाठी नाशिक मनपास निधीची आवश्यकता असल्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून  पालकमंत्री दादा भुसे यांच्या माध्यमातून उपलब्ध करून घेण्यासाठी प्रयत्न  करू, असेह बोरस्ते यांनी म्हटले आहे

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *