इगतपुरी : प्रतिनिधी
इगतपुरी तालुक्यातील वैतरणा धरणात एका अल्पवयीन युवकाचा बुडून मृत्यू झाला असून, एकजण बेपत्ता आहे, अशी माहिती मिळाली. कल्याण येथून काही जण कुटुंबासह वैतरणा धरणावर फिरण्यासाठी आलेले असताना धरणाच्या पाण्यात आंघोळ करण्यासाठी दोन युवक पाण्यात उतरले. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने दोन्ही युवक पाण्यात बुडाल्याची प्राथमिक माहिती समजताच घोटी पोलीस तत्काळ घटनास्थळी
दाखल झाले. पोलिसांनी स्थानिक पाणबुड्यांच्या सहाय्याने शोध घेण्याचे कार्य सुरू केल्यावर पाण्यात बुडून मृत झालेल्या लक्ष नितीन मगरे या 12 वर्षीय मुलाचा मृतदेह बाहेर काढण्यात पोलिसांना यश आले.
मात्र, 15 वर्षीय प्रेम रमेश मोरे याचा शोध सुरू असताना सायंकाळ झाल्याने शोधकार्य थांबवण्यात आले आहे. आज (दि. 5) सकाळी परत शोधकार्य सुरू करणार आहोत, अशी माहिती घोटी पोलिसांनी
दिली.