नाशिक : प्रतिनिधी
अष्टौप्रहर स्वरहोत्र नाशिकमधील ‘दिग्गज गायक, कलाकार, सृजन, रसिक आणि भक्त’ यांची मांदियाळी अनुभवास मिळाली. या उपक्रमाचे हे चौथे वर्ष होते. शास्त्रीय संगीतातील विविध रागांची अदाकारी अन् सोबतीला तितक्याच समर्थ साथसंगतीमुळे शंकराचार्य न्यासाच्या बालाजी मंदिर प्रांगणात ’ग्रंथ तुमच्या दारी’तर्फे सादर अष्टौप्रहर स्वरहोत्राने निसर्गरम्य परिसर भारावून
टाकला. विविधांगी कलाविष्कारांच्या माध्यमातून संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्याच्या संकल्पातून अष्टौप्रहर स्वरहोत्राने अखंडित सेवेला शनिवारी (दि. 3) सायंकाळी प्रारंभ केला.
या उपक्रमाच्या संकल्पात अखंड चोवीस तास संगीतसेवा व गायन-वादनाची पर्वणी मिळाली. विनायक रानडे, एन.सी. देशपांडे, आर्कि. समीर देशपांडे, सी. एल. कुलकर्णी, संजय कंक या सृजनांचं प्रयोजन, संकल्पन, आरेखन, नियोजन आणि निवेदन, सोबतीला बालाजी संस्थान यांचं आयोजन आणि नाशिकमधील समस्त कलाकारांचं समर्पण या त्रिवेणी संगमातून नाशिक शहरात शास्त्रीय स्वरांची मांदियाळी जमली होती
शनिवारी (दि. 3 जानेवारी) संध्याकाळी सातपासून ते रविवार, 4 जानेवारी संध्याकाळी सातपर्यंत बालाजी मंदिर , गंगापूर रोड, नाशिक येथे सलग 24 तास अष्टौप्रहर स्वरहोत्र झाले. गीतापठण, श्रीसूक्त पठण, श्रीराम नाम जपमाळ, अक्षर समिधा, रामनाम जप शोभायात्रा, महिलांची दुचाकीवरून चित्रांजली, चित्रकला पुष्पांजली, गंधसेवा शंखनाद, सुलेखन
रांगोळी, शिल्प, शास्त्रीय गायन पदन्यास यांचा आविष्कार बघावयास मिळाला. नाशिक शहरातील सर्व कलाकारांनी या कार्यक्रमाच्या आयोजनात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.
संकल्प यशस्वी
एका अपूर्व विचार, संकल्पना, स्वराविष्कार आणि संधी याचे साक्षीदार होणे, हे नाशिककरांचे परमकर्तव्य होय. सर्वांची सुयोग्य साथ लाभल्यास एक नवीन संकल्पना रुजवण्याचा, सर्वांना एकाच मंचावर, एकाच विचारधारेवर रुजविण्याचा हा संकल्प यशस्वी झाला. भारतीय शास्त्रीय संगीत ‘गायन, वादन, नृत्य आणि चित्रकला’ कापूस शिल्प, चित्रांजली, बाल चित्रांजली, वस्त्र चित्रांजली, म्युरल चित्रांजली, तसेच दिवसाच्या आठ प्रहराशी निगडित विविध ‘थाट, राग, घराणी, पद्धती, वैशिष्टय आणि गायकी’ सोबतीला विविध वाद्ये, वादनकौशल्य, नृत्य आणि विविध कलांचा संगम अनुभवयास मिळाला.
Invention of art, music, and culture through Ashtaupraha Swarahotra
सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…
टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…
बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…
महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…