युद्ध भारताच्या उंबरठ्यावर; अमेरिकेने घडविला स्फोट, 80 जणांचा मृत्यू
नवी दिल्ली :
श्रीलंकेच्या दक्षिण किनारपट्टीवर एका इराणी जहाजावर पाणबुडीद्वारे भीषण हल्लाा करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात जहाजावरील सुमारे 80 जणांचा मृत्यू झाला असून, 100 हून अधिक लोक समुद्रात बेपत्ता झाले आहेत. या घटनेमुळे हिंद महासागरात प्रचंड तणाव निर्माण झाला असून, श्रीलंकेच्या लष्कराने मोठ्या प्रमाणावर शोध आणि बचाव कार्य सुरू केले आहे. ही नौका श्रीलंकेच्या किनार्यापासून साधारण 25 मैल दक्षिणेला असताना अचानक मोठा स्फोट होऊन बुडू लागली.
संरक्षणम ंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा स्फोट एका अज्ञात पाणबुडीने केलेल्या हल्ल्यामुळे झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. या ऑपरेशनमध्ये 50 हजारांहून अधिक अमेरिकन सैनिक सहभागी आहेत. सुमारे 200 फायटर जेट, दोन विमानवाहू जहाजे आणि बॉम्ब टाकणारी विमाने यात समाविष्ट आहेत. इराणच्या हवाई संरक्षण प्रणाली, क्षेपणास्त्रे आणि डोनचे मोठे नुकसान झाले आहे. या इराणी जहाजावर एकूण 180 लोक स्वार होते. पाणबुडीतून डागलेल्या टॉर्पेडोने जहाजाला लक्ष्य केले, ज्यामुळे जहाजाचा मोठा भाग समुद्रात बुडाला. आतापर्यंत 80 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली असून, 32 जणांना सुखरूप वाचवण्यात नौदलाला यश आले आहे. उर्वरित 68 जण अजूनही बेपत्ता असून, त्यांचा शोध घेण्यासाठी नौदलाची जहाजे आणि विमाने तैनात करण्यात आली आहेत.
जहाजावरून संकटकालीन संकेत मिळताच श्रीलंकेच्या नौदलाने तत्काळ बचाव पथक रवाना केले.
संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, इराणी जहाजाकडून तातडीचा मदतीचा संदेश प्राप्त झाला होता. त्यानंतर विनाविलंब बचाव मिशन सुरू करण्यात आले. आमचे पहिले प्राधान्य समुद्रात अडकलेल्या लोकांचे प्राण वाचवणे, हे आहे. वाचवण्यात आलेल्या 32 जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री विजिता हेराथ यांनीया घटनेवर अधिकृत भाष्य करताना सांगितले की, बुडणार्या जहाजावरील कर्मचार्यांना वैद्यकीय उपचारांसाठी किनार्यावर आणले गेले आहे. या हल्ल्याचे स्वरूप पाहता श्रीलंकेने या घटनेला चोख प्रत्युत्तर देण्याचे संकेत दिले आहेत. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, या हल्ल्याची जबाबदारी अमेरिकेने घेतल्याचे वृत्त समोर येत आहे. तथापि, हे व्यापारी जहाज होते की लष्करी रसद पुरवणारे जहाज, याबद्दल अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षाचे पडसाद आता श्रीलंका आणि भारतीय उपखंडाच्या समुद्रात उमटू लागल्याने संरक्षण तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे.
श्रीलंकेच्या सागरी हद्दीत झालेला हा हल्ला आंतरराष्ट्रीय सागरी कायद्याचे उल्लंघन असल्याचे मानले जात आहे. या हल्ल्यानंतर हिंद महासागरातील इतर व्यापारी जहाजांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. येत्या काही तासांत श्रीलंका सरकार यावर अधिकृत भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे.
भारतातून परतत होती युद्धनौका
इराणी युद्धनौका गेल्या महिन्यात भारतातील विशाखापट्टणम येथे झालेल्या 2026 च्या आंतरराष्ट्रीय फ्लीट रिव्ह्यूमधून परतत होती. श्रीलंकेच्या अधिकार्यांनी सांगितले की, मदतीसाठी संदेश बुधवारी सकाळी 6 ते 7 (भारतीय वेळेनुसार) दरम्यान पाठवण्यात आला. हे जहाज दक्षिण श्रीलंकेच्या गॅले शहरापासून सुमारे 40 नॉटिकल मैल (सुमारे 75 किलोमीटर) अंतरावर होते. उर्वरित सुमारे 150 क्रू सदस्यांचे काय झाले हे अधिकारी शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. इराणची 17 जहाजे नष्ट करण्यात आली, ज्यात एक पाणबुडीदेखील समाविष्ट आहे.
Iranian ship destroyed in submarine attack