सिडको विशेष प्रतिनिधी
पक्षामध्ये उघडपणे नाराजी व्यक्त करणं हा जर गुन्हा असेल तर तो गुन्हा मी केलेला आहे, आणि जर त्या गुन्ह्याची शिक्षा हकालपट्टी असेल, तर त्याचं उत्तर मी काय देणार, असा थेट सवाल सुधाकर बडगुजर यांनी केला आहे. पक्षविरोधी वक्तव्य केल्याचा ठपका ठेवत त्यांची हकालपट्टी करण्यात आली. मात्र मी पक्षाविरुद्ध कोणतंही वक्तव्य केलेलं नाही, असा दावा त्यांनी केला.
मी असं काही वक्तव्य केलं असेल, तर ते मीडियामार्फत समोर आणावं, असं थेट आव्हानच माजी सभागृह नेते तथा शिवसेनेचे उपनेते बडगुजर यांनी दिलं. संघटनात्मक बदल झाल्यानंतर नाराजी व्यक्त केली होती, आणि ती काल उघडपणे बोलून दाखवली. तो जर गुन्हा असेल तर तो मी केलाय, आणि त्याची शिक्षा हकालपट्टी असेल, तर ती मला मान्य आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.
उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधणार का, असा प्रश्न विचारण्यात आला असता, त्यांनी उत्तर दिलं की हकालपट्टीनंतर कोणता संवाद साधायचा? न्यायालयातसुद्धा एकतर्फी निर्णय होत नसतो. दोन्ही बाजू ऐकून निर्णय घेतला जातो. मात्र इथे तसं झालेलं नाही, असं सांगत सुधाकर बडगुजर यांनी नाराजी व्यक्त केली.दरम्यान शिवसेना कार्यालयात आज काही नियोजित प्रवेश होते. पण काही वैयक्तिक कार्यक्रमामुळे मी बाहेर होतो, त्यामुळे पक्ष कार्यालयात जाऊ शकलो नाही, असंही त्यांनी शेवटी सांगितलं.
दरम्यान सुधाकर बडगुजर यांच्या समर्थकांनी सिडकोतील बडगुजर यांच्या कार्यालयाबाहेर घोषणाबाजी करुन बडगुजर यांचे समर्थन केले
अशोकनगरमध्ये १६ वर्षीय मुलाचा संशयास्पद मृत्यू, परिसरात खळबळ सिडको/ सातपूर: प्रतिनिधी : सातपूरच्या अशोकनगर परिसरात…
तिघांना अटक; घटना सीसीटीव्हीत कैद मालेगाव : प्रतिनिधी शहरातील जुना आग्रारोडवरील नानावटी पेट्रोलपंपाजवळ एका तरुणाची…
श्यामची आई उत्कृष्ट सिनेमा; शाहरूख खान, राणी मुखर्जीलाही पुरस्कार नवी दिल्ली : भारतातील राष्ट्रीय पुरस्कारांची…
डॉ. नीलम रहाळकर यांचे रविवारी 'अरंगेत्रम्'; वैद्यकीय व्यवसाय सांभाळत जोपासली नृत्यसाधना नाशिक - विशेष प्रतिनिधी…
कळवण येथील भूमिअभिलेखचा लिपिक लाच घेताना रंगेहाथ नाशिक: प्रतिनिधी मोजणी केलेल्या जमिनीचा अहवाल देण्याच्या मोबडल्यात…
मुंबई: विधिमंडळात ऑनलाईन रमी खेळल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेलं कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या खात्यात बदल करण्यात…