कोकाटे यांना कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता?

अटकेसाठी नाशिक पोलिस मुंबईमध्ये दाखल

नाशिक : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांना अटक करण्यासाठी नाशिक पोलिस मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. नाशिक पोलिसांचे पथक वांद्रे पोलिस ठाण्यात दाखल झाल्याची माहिती मिळाली आहे. माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात अटक वॉरंट निघाल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. कोकाटे यांच्याविरुद्ध अटक वॉरंट निघाल्यानंतर कोकाटे वांद्रे येथील लीलावती रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत. नाशिक पोलिसांची टीम ज्यामध्ये दहा हवालदार, तीन अधिकारी अशा एकूण 13 जणांची टीम कोकाटे यांना अटक करण्यासाठी मुंबईमध्ये दाखल झाली आहे.
दहा मिनिटांपूर्वी नाशिक पोलिसांची टीम मुलुंड टोलनाका क्रॉस करून मुंबईमध्ये दाखल झाली आहे. अर्धा तासामध्ये नाशिक पोलिस वांद्रे येथील लीलावती रुग्णालयामध्ये दाखल होतील. माणिकराव कोकाटे यांना अटक करण्याच्या प्रोसेस सुरू करणार आहेत. नाशिक पोलिसांकडून कारवाईपूर्वी कोकाटे यांचा सध्याचा वैद्यकीय अहवाल पाहून तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन पोलिस पुढे कारवाई करण्याबाबत निर्णय घेतील. शिवाय, कारवाईपूर्वी नाशिक पोलिस वांद्रे पोलिसांना याबाबत कळवू शकतात. मात्र, न्यायालयाचे आदेश असल्याने मुंबई पोलिसांना कळवणे तसे बंधनकारक नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, कोकाटेंवर कारवाईपूर्वी वैद्यकीय अहवाल आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात
येत आहे.
नाशिक शहरातील उच्चभ्रू परिसरात माणिकराव कोकाटे यांनी 30 वर्षांपूर्वी कमी उत्पन्न दाखवत अल्प उत्पन्न गटातून सदनिका मिळवली
होती.
स्वत:सह भाऊ विजय कोकाटे, पोपट सोनवणे आणि प्रशांत गोवर्धने या चार जणांनी कॅनडा कॉर्नर भागात निर्माण व्ह्यू अपार्टमेंटमध्ये मुख्यमंत्री कोट्यातून अल्प उत्पन्न गटासाठीच्या सदनिका प्राप्त केल्या होत्या. या प्रकरणी
फेब्रुवारी 2025 मध्ये माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने दोषी ठरवले होते. यावर माणिकराव कोकाटे यांनी नाशिक सत्र न्यायालयात अपील केले होते. सत्र न्यायालयाने शिक्षा कायम ठेवली. माणिकराव कोकाटे यांनी उच्च न्यायालयात धाव
घेतली आहे.

तीन अधिकारी, दहा पोलिस अंमलदार मुंबईत दाखल

नाशिक येथील दहावे मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्याकडून माणिकराव शिवाजीराव कोकाटे यांचे एनबीडब्ल्यू वॉरंट (अजामीनपात्र) प्राप्त झाले आहे. ते बजावण्याकरिता नाशिकच्या पोलिस आयुक्तालयाची टीम मुंबईत दाखल झाली आहे. या पथकामध्ये तीन अधिकारी आणि दहा पोलिस अंमलदारांचा समावेश आहे, अशी माहिती सहाय्यक पोलिस आयुक्त संदीप मिटके यांनी दिली.

Is Kokate likely to be arrested at any moment?

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *