नाशिक

टोल वसूल इतकीच सरकारची जबाबदारी?

एक्स्प्रेस वेवरील वाहतूक ठप्प : राज ठाकरे भडकले

मुंबई :
गॅसचा टँकर उलटल्यानंतर गेल्या 32 तासांपेक्षा जास्त काळ बंद असणार्‍या मुंबई – पुणे द्रुतगती मार्गामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. या प्रकरणावरून मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल करत फक्त रस्ता बांधला आणि टोल वसूल केला इतकीच सरकारची जबाबदारी आहे का? असा प्रश्न विचारला आहे. त्यांनी सोशल मीडियावर लिहिलेल्या पोस्टमध्ये राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
राज ठाकरे यांनी म्हटले की, गॅसचा टँकर उलटल्यानंतर तर काय उपाययोजना करून कमीत कमी वेळेत रस्ता मोकळा करता येईल, याचा कृती आराखडा प्रशासनाकडे तयार होता का? स्व. बाळासाहेबांच्या प्रेरणेतून हा द्रुतगती मार्ग उभा राहिला, त्याला 24 वर्षे उलटली. पण या काळात काय काय आपत्ती येऊ शकते याचा विचार केला गेला नाही. संपूर्ण रस्ता उत्तम दर्जाचा राहील हे पाहिले गेले. मधल्या काळात एकच गोष्ट तत्परतेने केली गेली ती म्हणजे
टोल वसुली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे टोलचे आंदोलन हे सरकार, टोल वसूल करणारी कंपनी काय सुविधा प्रवाशांना देते याबद्दलचं. कालच्या घटनेनंतर हाच प्रश्न आहे की, रस्ता बांधला आणि टोल वसूल केला इतकीच सरकारची जबाबदारी आहे का? परवाच्या अर्थसंकल्पात मुंबई-पुणे हायस्पीड ट्रेनची घोषणा केली गेली. ती होईल तेव्हा होईल. पण त्या आधी मुंबई-पुणे प्रवास सुरळीत करा. हल्ली मुंबई-पुणे प्रवास हा नक्की किती तासांत होईल याबद्दल कोणीच शाश्वती देऊ शकत नाही. मुंबई आणि पुणे ही या राज्याच्या आणि देशाच्या विकासाची इंजिनं आहेत असं एका बाजूला म्हणायचं आणि 32 तास या दोन शहरांतील वाहतूक ठप्प होते याकडे स्वस्थपणे बघायचे यासाठी लागणारा कोडगेपणा अनाकलनीय आहे.
ट्रक बंद पडल्यानं आणि चालक झोपी गेल्यानं वाहनांच्या रांगा-
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील गॅसचा टँकर 32 तासांनी हटवण्यात आला. त्यानंतर मुंबईकडे जाणारा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. पण मळवली जवळ एक ट्रक बंद पडला आहे. तसेच अनेक अवजड वाहनांचे चालक झोपी गेल्याने कामशेत जवळ वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत. आता महामार्ग पोलीस झोपी गेलेल्या वाहन चालकांना उठवून गाड्या पुढं काढण्याचे प्रयत्न करत आहेत. त्यामुळं आडोशी बोगध्याजवळ वाहतूक सुरळीत असली तरी प्रवाशांना काहीवेळ ताटकळत बसावे लागले.

वसूल केलेला टोल परत करा

प्रवाशांकडून या काळात टोल वसूल केला गेला, तो सरकारने त्यांना परत केला पाहिजे. आणि चौकश्यांचा फार्स न करता या घटनेसकट इतर काय घटना घडू शकतात आणि त्यावर तात्काळ उपाय कसा केला जाऊ शकतो याचा कृती आराखडा तयार करून लोकांसमोर ठेवला पाहिजे. सरकारमध्ये पालकमंत्री असतात आणि या सरकारमध्ये तर पालकमंत्रिपदावरून वाद सुरू असतात. पालकत्वाची इतकी आस असलेलं सरकार असूनसुद्धा नागरिकांना निराधार वाटावं अशी परिस्थिती का येत आहे, याचा सरकारने विचार करावाच.

 

 

 

 

 

 

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

6 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

6 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

6 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

6 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

7 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

7 hours ago