स्वतःच्या जागेतील अतिक्रमण काढणे गुन्हा आहे का? छगन जाधव यांचा सवाल

सप्तश्रृंग गड : स्वतः च्या जागेत शेजारच्या व्यक्तीने केलेलं अतिक्रमण काढणे गुन्हा आहे का? असा संतप्त सवाल सप्तश्रृंग गडावरील  आदिवासी समाजाचे छगन जाधव यांनी केला आहे.

सप्तशृंगी गडावरील युवराज संपत पवार तुमच्या कामावर न्यायालयीन स्टे आदेश आहे व तुम्ही कोणत्याही कार्यालयाची परवानगी न घेता अनाधिकृत बांधकाम माझ्या हद्दीत करत आहे हे चुकीचे आहे असे सांगण्यासाठी  छगन जाधव गेले असता युवराज पवार,महेंद्र पवार,सतिलाल पवार,व हिराबाई पवार यांनी रागाच्या सतांपात छगन जाधव यांना बेदम मारहान गेली…तुझ्यात दम असेल तर आमचे अनाधिकृत बांधकाम तोडुन दाखव. अशाप्रकारे चेतावणी दिल्यानंतर
छगन जाधव यांनी त्याच्या हद्दीत केलेले अनधिकृत बांधकाम तोंडुन टाकले. अनाधिकृत बांधकाम तोडतेवेळी व्हिडिओ शूटिंग काढण्याची पूर्वतयारी युवराज पवार यांच्या कुटुंबीयांनी केलेली होती.. ते व्हिडिओ शूटिंग काढण्यासाठी आधीच गच्चीवर जाऊन उभे होते. हे व्हिडिओ शूटिंगमध्ये स्पष्ट दिसत आहे

सदर प्रकरणाची सत्यता पडताळणीसाठी घटनास्थळी स्थानिक पोलीस निरीक्षक शिरसाठ ,पोलीस हवलदार शेवाळे,शिंदे व स्थानिक ग्रामपंचायत सरपंच,ग्रामसेवक व सदस्य मंडळ यांनी प्रत्यक्षात वादाची जागा मोजली असता युवराज संपत पवार यांची दक्षिण बाजूला पाच फूट जागा अतिक्रमण केलेली निघाल्याचे पडताळणीत समोर आले
त्या ठिकाणी त्वरित ग्रामसेवक देवरे यांनी स्वतःची स्वाक्षरी करून युवराज संपत पवार यांना त्याचा प्रत्यक्षात भरलेल्या जागेचा उतारा देण्यात आला या प्रकरणात सर्व कागदो पत्री बघिले असता या प्रकरणांमध्ये पूर्णतः हॉटेल वाले युवराज संपत पवार याची व त्यांच्या कुटुंबीयांची चुक समोर आली। सर्व प्रकरण घडल्यानंतर युवराज संपत पवार यांच्या कुटुंबीयांनी छगन जाधव यांना सांगितले की तुझ्यावर वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल करू व तुझी नोकरी घालवू तसेच आमचे नासिक येथील तहसीलदार साहेब ओळखीचे आहेत ते बरोबर करतील असा दम दिला

छगन जाधव यांच्या विषयी पूर्णता चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहे चुकीच्या बातम्या पसरवणाऱ्याच्या विरोधात मानहानीचा गुन्हा दाखल करणार असल्याचे छगन जाधव त्यांनी सांगितले

Bhagwat Udavant

Recent Posts

वधूचा घागरा बदलून न दिल्याने  नियोजित वराने केले असे काही….

  वधूचा घागरा बदलून न दिल्याने  नियोजित वराने केले असे काही.... शहापूर : साजिद शेख…

15 hours ago

मृत्यू पश्चातही आदिवासींच्या नशिबी  पुन्हा मरण यातनाच

मृत्यू नंतरही  आदिवासींच्या नशिबी  पुन्हा मरण यातनाच मोखाडा: नामदेव ठोंमरे मोखाडा तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या…

15 hours ago

सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघाचे आज अधिवेशन

सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघाच्या वर्धापन दिनानिमित्त  आज राज्यस्तरीय भव्य अधिवेशन नाशिक प्रतिनिधी सेवा…

15 hours ago

त्र्यंबकेश्वर श्रावणी सोमवारी भाविकांसाठी रा. प.कडून 33 जादा बसेसची सोय

नाशिक : प्रतिनिधी श्रावण महिन्यातील पहिला, दुसरा व चौथा श्रावणी सोमवार अनुक्रमे 28 जुलै, 4…

18 hours ago

शहरात दिवसभरात 14.2 मिमी पावसाची नोंद

जिल्ह्यातील नऊ धरणांतून विसर्ग सुरू नाशिक : प्रतिनिधी शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या…

18 hours ago

फायदेशीर करार

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मनमानी करत अनेक देशांवर जबर आयातशुल्क लादले. विशेषतः चीनवर जबर…

18 hours ago