इस्रोच्या ब्लूबर्ड ब्लॉक- 2 चे यशस्वी प्रक्षेपण

श्रीहरिकोटा :
भारतीय अवकाश संशोधन संस्थाने नुकतेच एका ऐतिहासिक मोहिमेचे प्रक्षेपण केले आहे. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रातून सकाळी 8.54 वाजता ‘एलव्हीएम3-एम6’ या भारताच्या सर्वात शक्तिशाली रॉकेटद्वारे अमेरिकेचा ’ब्लूबर्ड ब्लॉक-2’ हा उपग्रह अवकाशात सोडला आहे. हा उपग्रह केवळ एक यंत्र नसून मोबाइल तंत्रज्ञानातील मोठी क्रांती आहे. कारण ब्लूबर्ड ब्लॉक-2 हा जगातील सर्वांत मोठा व्यावसायिक दळणवळण उपग्रह आहे.
ब्लूबर्ड ब्लॉक-2 मिशन हे ग्लोबल एलइओ कॉन्स्टेलेशनचा एक भाग आहे, ज्याचा उद्देश सॅटेलाइटद्वारे थेट मोबाइल फोनवर कनेक्टिव्हिटी प्रदान करणे आहे. यामुळे 4 जी आणि 5 जी व्हॉइस कॉल, व्हिडीओ कॉल, मेसेजिंग आणि डेटा सेवा जगाच्या कोणत्याही भागात उपलब्ध करून दिल्या जातील. कोणत्याही स्मार्टफोनद्वारे अंतराळातून थेट कॉल करता येईल. मात्र, सध्या विमानात बसून कॉल करता येत नाही. कारण याचा नेव्हिगेशन सिस्टिमवर परिणाम होतो. इस्रोच्या मते, हे मिशन एक समर्पित व्यावसायिक प्रक्षेपण आहे, जे न्यू स्पेस इंडिया लिमिटेड आणि अमेरिकेच्या स्पेसमोबाइल कंपनीद्वारे करण्यात आले आहे.

ISRO's Bluebird Block-2 successfully launched

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *