सिडकोतील हेडगेवार चौकात मुलींनीच दिला टवाळखोरांना चोप
सिडको विशेष प्रतिनिधी :-बदलापूरच्या अत्याचाराची घटना ताजी असताना सर्वत्र सोशल मीडियावर महिला युवतींना स्वसंरक्षणाबाबत जनजागृती केली जात आहे. असे असताना सिडकोतील हेडगेवार चौकात पुन्हा एकदा चार ते पाच टवाळखोरांपैकी एका टवाळखोराने पायी जाणाऱ्या महिलेला अश्लील हावभाव करून तिची छेड काढली. दरम्यान या महिलेसह अन्य रस्त्यावरून जाणाऱ्या दोन ते तीन महिला या महिलेच्या मदतीला धावून गेल्या आणि काही वेळातच टवाळखोरांवर त्यांनी हल्ला चढवला,
पाहा व्हिडीओ
टवाळखोरांना प्रत्युत्तर केल्यानंतर सदर टवाळखोर हे घटनास्थळावरून पळून गेले यामुळे युवतींच्या या दबंग कामगिरीमुळे सर्वत्र कौतुक केले जात आहे या घटनेचा सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्याने दिवसभर एकच चर्चा सुरू होती. बुधवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास हेडगेवार चौकात ही घटना घडली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर माजी नगरसेविका भाग्यश्री ढोमसे यांनी पोलिसांना पत्रव्यवहार केला असून या ठिकाणी बसणाऱ्या टवळाखोरांवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
कसबे सुकेणे येथील तिडके वस्तीवर जेरबंद झाला बिबट्या कसबेसुकेणे: येथील दशरथ पोपट तिडके यांच्या शेत…
सातपूर: प्रतिनिधी सातपूर एमआयडीसीतील ज्योतीस्ट्रक्चर कंपनीला आज दुपारच्या सुमारास आग लागली . या आगीचे कारण…
लासलगावी कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक ; कांद्याचे लिलाव पाडले बंद लासलगाव:-समीर पठाण केंद्र सरकारने कांद्यावरील…
मनमाड : प्रतिनिधी मराठीत एक म्हण आहे साधु संत येता दारी तोच दसरा दिवाळी ती…
ऑनर किलींग रोखण्यासाठी आता हेल्पलाईन तर गेस्ट हाऊस होणार सेफ होम ! निर्णयाचे अंनिस कडून…
पारा ५.७ अंशावर स्थिर ,द्राक्षबागायतदार अस्थिर! निफाड : प्रतिनिधी शहरासह तालुक्यात थंडीने मुक्काम. वाढविला आहे…