ऐकावे ते नवलच! 36 वर्षाच्या
विवाहितेचा पंधरा वर्षाच्या मुलाला घेऊन पोबारा
सिडको : विशेष प्रतिनिधी
असे म्हणतात, की प्रेमाला वय, जाती पातीचे कुठलेही बंधन नसते. प्रेम हे आंधळे असते. ते कधी कुणावर होईल, हे सांगता येत नाही. ,. परंतु इतकेही आंधळे नसावे, अशी एक घटना शहरातील सिडको भागात घडली आहे.
सिडकोत राहणार्या एका 36 वर्षीय महिलेचा आपल्या मुलाच्या वयाच्या असलेल्या पंधरा वर्षाच्या मुलावर जीव जडला. बर्याच दिवसांपासून सुरू असलेल्या या जगावेगळ्या प्रेमाची परिसरात चर्चा झाली. अन् एक दुजे के लिए बनलेल्या या 36 वर्षाची प्रेमीका आणि पंधरा वर्षाच्या अल्पवयीन प्रेमीविराने थेट घरातून पळून जाण्याचा पराक्रम केला.
या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गेल्या डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सदर महिला आणि अल्पवयीन मुलगा हे घर सोडून पळून गेले. मुंबईतील एका ठिकाणी ते राहत होते. या महिलेच्या पतीला घटनेची कल्पना मिळताच त्याने संबंधित घटनेची माहिती पोलिसांना दिली. तपासानंतर हा प्रकार उघडकीस आला. सदर महिला विवाहित असून, तिला एक 15 वर्षीय मुलगी आणि 10 वर्षीय मुलगा आहे. ती तिच्या कुटुंबासह सिडको परिसरात राहत होती. मात्र, पंधरा वर्षीय मुलासोबत तिच्या संबंधांमुळे कुटुंबीय आणि समाजात मोठी चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणात अंबड पोलीस ठाण्यात कलम 363 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक सुनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.
मुलाला मुलगी पाहण्यासाठी गेलेल्या पित्याने त्या मुलींसोबत लग्न केल्यामुळे मुलाने संतापातून संन्यास घेतल्याचा प्रकार चार दिवसांपूर्वी याच भागात उघडकीस आला होता, या प्रकरणाची चर्चा रंगत असतानाच या महिलेचे अल्पवयीन मुलासोबत केलेलं पलायन पाहता समाज अधोगती कडे चालल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
अशोकनगरमध्ये १६ वर्षीय मुलाचा संशयास्पद मृत्यू, परिसरात खळबळ सिडको/ सातपूर: प्रतिनिधी : सातपूरच्या अशोकनगर परिसरात…
तिघांना अटक; घटना सीसीटीव्हीत कैद मालेगाव : प्रतिनिधी शहरातील जुना आग्रारोडवरील नानावटी पेट्रोलपंपाजवळ एका तरुणाची…
श्यामची आई उत्कृष्ट सिनेमा; शाहरूख खान, राणी मुखर्जीलाही पुरस्कार नवी दिल्ली : भारतातील राष्ट्रीय पुरस्कारांची…
डॉ. नीलम रहाळकर यांचे रविवारी 'अरंगेत्रम्'; वैद्यकीय व्यवसाय सांभाळत जोपासली नृत्यसाधना नाशिक - विशेष प्रतिनिधी…
कळवण येथील भूमिअभिलेखचा लिपिक लाच घेताना रंगेहाथ नाशिक: प्रतिनिधी मोजणी केलेल्या जमिनीचा अहवाल देण्याच्या मोबडल्यात…
मुंबई: विधिमंडळात ऑनलाईन रमी खेळल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेलं कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या खात्यात बदल करण्यात…