नाशिक

णमोकार तीर्थावर जैन धर्मीयांचा कुंभमेळा

आजपासून आंतरराष्ट्रीय पंचकल्याणक महोत्सव

नाशिक/चांदवड : प्रतिनिधी
जैन धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या माळसाणे (ता. चांदवड) येथील णमोकार तीर्थावर आजपासून (शुक्रवार, 6 फेब्रुवारी) आंतरराष्ट्रीय पंचकल्याणक प्रतिष्ठा आणि महामस्तकाभिषेक महोत्सवाचा ऐतिहासिक सोहळा सुरू होत आहे. या भक्तीच्या कुंभमेळ्यासाठी देशभरातून हजारो भाविक दाखल झाले असून, गुरुदेवांच्या मंगल आगमनाने संपूर्ण परिसरात आध्यात्मिक चैतन्य संचारले आहे.
महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर णमोकार तीर्थाच्या पावनभूमीवर राष्ट्रसंत आचार्य श्री देवनंदीजी महाराज, मुनी श्री अमोलकीर्तीजी आणि मुनी श्री अमरकीर्तीजी यांच्यासह 200 पेक्षा जास्त साधू-साध्वी आणि विशाल श्रमण संघाची उपस्थिती लाभली आहे. तसेच परमपूज्य आचार्य 108 श्री पुष्पदंतसागरजी महाराज, आचार्य श्री सिद्धांतसागरजी महाराज, आचार्य श्री प्रसन्नऋषीजी महाराज, आचार्य श्री तीर्थनंदीजी महाराज, आचार्य श्री प्रणामसागरजी महाराज, आचार्य श्री दयाऋषीजी महाराज आणि गणिनी आर्यिका 105 सौभाग्यमती माताजी या सहा आचार्यांच्या मंगल प्रवेश सोहळ्याने भाविकांमध्ये मोठा उत्साह निर्माण
झाला आहे.
या सोहळ्यानिमित्त निघालेली भव्य शोभायात्रा भक्ती आणि वैभवाचा अनुपम संगम ठरली. सुमारे तीन किलोमीटरच्या पायी विहारानंतर निघालेल्या या शोभायात्रेत सजवलेले हत्ती, चांदीचा रथ, मंगल बँडपथक आणि मालेगावच्या जोशी मंडळाच्या नादमय शंखनादाने अवघा परिसर दुमदुमून गेला होता. आकाशातून होणारी पुष्पवृष्टी आणि ‘जय गुरुदेव’च्या जयघोषात भाविकांनी गुरुदेवांचे स्वागत केले. या दिव्य रथाचे सारथ्य सौधर्म इंद्र नीलम अजमेरा व कीर्ती अजमेरा यांनी केले असून, त्यांच्या नि:स्वार्थ सेवाभावाबद्दल कुंथुगिरी ट्रस्टतर्फे त्यांचा विशेष गौरव करण्यात आला.
आजपासून सुरू होणार्‍या या मुख्य सोहळ्यासाठी महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान आणि कर्नाटक या राज्यांतील हजारो भाविकांची मांदियाळी णमोकार तीर्थावर जमली आहे. कलशधारी महिलांचे समूह आणि मंगल मंत्रोच्चारांमुळे परिसरात सात्त्विक वातावरण निर्माण झाले आहे. हा महोत्सव श्रद्धा, साधना आणि आत्मशुद्धीचे जागतिक केंद्र बनत असल्याची प्रचिती भाविकांना येत आहे.

भक्तीचा महापूर

दि. 5 रोजी जेव्हा राष्ट्रसंत आचार्य श्री 108 देवनंदीजी महाराज आणि त्यांचे दीक्षा गुरू परमपूज्य आचार्य श्री 108 गुणनंदीजी महाराज यांची भेट झाली. या गुरू-शिष्य मिलनाचे साक्षीदार होण्यासाठी देशभरातून लाखो जैन बांधवांनी णमोकार तीर्थावर गर्दी केली होती. णमोकार तीर्थाचे प्रणेते आचार्य देवनंदीजी महाराज यांनी आपल्या गुरूंच्या आगमनाप्रीत्यर्थ भव्य स्वागताचे नियोजन केले होते. आचार्य गुणनंदीजी महाराजांचे आगमन होताच संपूर्ण परिसर णमोकार महामंत्र आणि गुरूंच्या जयघोषाने दुमदुमून गेला. देवनंदीजी महाराजांनी अत्यंत विनयाने आपल्या गुरूंचे पादप्रक्षालन केले. अनेक वर्षांनंतर झालेल्या या भेटीने उपस्थित भाविकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू उभे राहिले.
या गुरू-शिष्य भेटीमुळे महोत्सवाच्या आध्यात्मिक ऊर्जेत मोठी भर पडली आहे. आचार्य गुणनंदीजी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली आता पुढील कार्यक्रम होणार आहेत. यावेळी बोलताना भाविकांनी सांगितले की, “असे गुरू-शिष्य मिलन पाहणे हे आमच्या भाग्याचे आहे, हे दृश्य डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे.“

Jain Kumbh Mela at Namokar Tirtha

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

11 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

11 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

11 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

11 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

11 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

12 hours ago