जनशताब्दीचे इंजिन फेल झाल्याने अडीच तास गाडी रुळावर,प्रवाशी हतबल

जनशताब्दीचे इंजिन फेल झाल्याने अडीच तास गाडी रुळावर,प्रवाशी हतबल

लासलगाव: समीर पठाण

जनशताब्दी एक्सप्रेसचे इंजिन फेल झाल्याने जालना-दादर जनशताब्दी एक्सप्रेस आज शुक्रवारी सकाळी लासलगाव रेल्वे स्थानकादरम्यान अचानक उभी राहिली.थोडा वेळ प्रवाशांनी हा प्रकार सहन केला.मात्र, एक-दीड तास झाला तरी रेल्वे जागेवरच उभी असल्याने प्रवाशी संतप्त झाले.कडाक्याच्या उन्हात रेल्वे रुळावरच उभी राहिल्याने प्रवासी वैतागून गेले.इंजिन फेल झाल्याने जनशताब्दी एक्सप्रेस रुळावरच अडीच तास उभी राहिली.परिणामी,मध्य रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.

जनशताब्दी एक्सप्रेसचे इंजिन आज सकाळी ११.३० वाजता फेल झाले.त्यामुळे ही एक्सप्रेस लासलगाव-निफाड रेल्वे स्थानकादरम्यान उभी राहिली. काही तांत्रिक कारणास्तव रेल्वे थांबल्याचे प्रवाशांना वाटले.मात्र,अनेक तास झाले तरी रेल्वे पुढे जात नसल्याने प्रवासी संतप्त झाले.बेजबाबदार रेल्वे प्रशासनमुळे ऐन उन्हाळ्यामध्ये ज्येष्ठ नागरिक,लहान बालके,महिला या सर्वच प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.

रेल्वेच्या कारभाराबाबत प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला.तब्बल अडीच तासांच्या काळात रेल्वेकडून कोणतीही सूचना प्रवाशांना देण्यात आली नाही. त्यामुळेही प्रवाशांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान,मनमाडहून मुंबईकडे जाणाऱ्या सर्व प्रवाशी गाड्या विलंबाने धावल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *