उत्तर महाराष्ट्र

सातपूरमधील खूनप्रकरणी पित्यासह दोन मुलांना जन्मठेप

नाशिक –
रागाच्या भरात संबलदेव यादव (वय ३०, रा. विश्वासनगर, सातपूर) याच्या डोक्यात बॅटने हल्ला चढवून त्यास जीवे ठार मारल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने पित्यासह दोन मुलांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. सातपूरमध्ये १४ नोव्हेंबर २०२० मध्ये ही घटना घडली होती.
जिल्हा व सत्र न्यायालयाचे (क्रमांक ०१) न्यायाधीश व्ही एस कुलकर्णी यांनी आज (दि.१४) हा निकाल दिला. सरकारतर्फे सहायक अभियोक्ता सचिन गोरवाडकर यांनी पुरावा सादर करत युक्तीवाद केला.
अभियोग कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, सातपूरमधील विश्वास नगर येथे असलेल्या हनुमान मंदिराजवळ १४ नोव्हेंबरला ही घटना घडली होती. यातील फिर्यादी संगिता संबलदेव यादव, त्यांचे दोन मुले व पती संबलदेव यादव हे
साला अमरजित यादव यास फटाके फोडल्याचे कारणावरून शिवीगाळ धक्कबुक्की केली म्हणून त्याचा जाब विचारण्यासाठी विशाल यादव याच्या घरी गेले होते. तेव्हा शेजारी रहाणारे आरोपी सुकट मोहोदर चौव्हाण (वय ५८), संदीप सुकट चौव्हाण (२२) संजय सुकट चौव्हाण (वय २५) यांनी आवाज का करतात, असे म्हणून वाद घातला. त्या वादातून रागाच्या भरात संदीप चौव्हाण याने घरात जाऊन बॅट आणली. तेव्हा सुकट चौव्हाण याने संबलदेव यादव यास पाठीमागून धरून ठेवले तर संदीपने डोक्यात बॅटने प्रहार केले. तसेच संजय चव्हाण याने दुसरी बॅट आणून मयताचे डाव्या डोळयावर मारली. त्यानंतर तो चक्कर येउन खाली पडला त्यावेळी आरोपी पळून गेले. जबर जखमी झालेल्या संबलदेव यादव यास उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले असता १८ नोव्हेंबरला त्याचा मृत्यू झाला होता.  याप्रकरणी सातपूर पोलिसांनी भादंवि कलम ३०२, ३२६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन उप निरीक्षक, टी एम राठोड यांनी केला. न्यायालयीन सुनावणीत आरोपीविरूध्द् फिर्यादी, साक्षीदार, पंच यांनी दिलेली साक्ष व तपासी अधिकारी यांनी सादर केलेल्या परिस्थितीजन्य पुराव्यास अनुसरून आरोपीतांस सीआरपीसी कलम २३५ (२) अन्वये भादंवि कलम ३०२ (खून) मध्ये जन्मठेप व प्रत्येकी दोन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास ०३ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावलेली आहे
Bhagwat Udavant

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

4 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

4 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

4 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

4 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

4 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

5 hours ago