जयंत नाइकनवरे यांनी स्वीकारला पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार
नाशिक : प्रतिनिधी
शहराचे नवीन पोलीस आयुक्त म्हणून जयंत नाइकनवरे यांनी पदभार स्वीकारला. मावळते पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांची मुंबईत महिला अन्याय अत्याचार विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून बदली झाली. काल सायंकाळी नाइकनवरे यांनी आयुक्तालयात येत पदभार स्वीकारला. यावेळी पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Good