कामगारवर्ग हा जगाचा आधारस्तंभ आहे, परंतु दिवसेंदिवस ढासळताना दिसत आहे. दरवर्षी 1 मे जगभर आंतरराष्ट्रीय कामगार दिवस म्हणून साजरा केला जातो.परंतु गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे कामगार दिवस काळोखात असल्याचे आपण पाहिले. त्याचबरोबर मागील दोन वर्षांत कोरोना व्हायरसच्या महामारीमुळे भारतासह जगभर कामगारांचे हाल-बेहाल झाल्याचे सुद्धा आपण उघड्या डोळ्यांनी पाहिले. आज जगाचा विचार केला तर 80 टक्के लोक कामगारांमध्ये मोडतात. यात अनेक क्षेत्रांतील कामगार वर्ग दिसून येतात. शेतीतील कामगार असो, कारखान्यातील कामगार असो किंवा इतर कोणत्याही क्षेत्रातील कामगार असो त्याची अत्यंत दयना अवस्था आहे. परंतु दोन वर्षांच्या काळात कोविड-19 कामगारांसाठी मौत का कुआ बनल्याचे जगाने पहिले.कोरोना काळात भारतासह जगभरात कामगारांवर उपासमारीची वेळ आल्याचे दिसून आले. ही अत्यंत गंभीर आणि चिंतेची घटना होती.आज विकसित, विकसनशील, गरीब या संपूर्ण देशांतील कामगारांवर जीवन-मरणाचा प्रश्न उद्भवत आहे. आज भारताचा विचार केला तर भारताची लोकसंख्या 135 कोटींच्या घरात आहे. यात कामगारवर्गाचा विचार केला तर 80 टक्के लोक कामगारांमध्ये मोडतात. यावरून आपण विचार करू शकतो की, कोविड-19 च्या संक्रमणामुळे कामगारांचे किती हाल-बेहाल झाले असतील. ही बाब संपूर्ण जगाने उघडल्या डोळ्यांनी पाहिली. कोरोना काळात स्वत:च्या गावाला जाण्याकरिता मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे प्रत्येक कामगार आपल्या गावाला जाण्याकरिता 200, 500, 900 किलोमीटरपर्यंत पायदळ चालतानाचे दृश्य आपण पाहिले. देशाचा विचार केला तर राजकीय पुढार्यांजवळ अरबो-खरबो रुपयांची चल-अचल संपत्ती आहे. ही संपत्ती राजकीय पुढार्यांनी कामगारांच्या प्रती उपयोगात आणली तर एक मदतीचा मोठा हात समजला जाईल. कामगार जगाचा शिल्पकार मानला जातो. यांची भूमिका देशासाठी व जगासाठी महत्त्वाची असते. आज शिल्पकाराचे हाल-बेहाल होत असल्याचे दिसून येते. कामगार हा जगाचा मोठा आधारस्तंभ आहे. कामगार नाही तर काहीच नाही.
रमेश लांजेवार